Jennifer Monserrate Passes Away Dainik Gomantak
गोवा

Jennifer Monserrate Passes Away: आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे निधन; सांतिनेज येथे होणार अंत्यसंस्कार, गोव्यात 2 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर

Goa BJP MLA Jennifer Monserrate Passes Away: विधानसभेत तीनवेळा ताळगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजपच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांची रविवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास दुर्धर आजाराने प्राणज्योत मालवली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: विधानसभेत तीनवेळा ताळगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजपच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांची रविवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास दुर्धर आजाराने प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर सांतिनेज येथील मोक्ष स्मशानभूमीत त्यांच्या इच्छेनुसार हिंदू रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राज्य सरकारतर्फे दोन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला असून, या काळात सरकारी इमारतीवरील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकविले जाणार आहेत, असे सरकारच्या वतीने कळविले आहे.

त्यांचे पार्थिव नातेवाईक, मित्र आणि हितचिंतकांना अंतिम दर्शन घेण्यासाठी उद्या (सोमवारी) सकाळी १० वाजल्यापासून ताळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येईल.

दुपारी ३.३० वाजता ताळगाव चर्चमध्ये अंत्यसंस्काराची प्रार्थना (फ्युनरल मास) होईल. त्यानंतर अंत्ययात्रा सांतिनेज येथील ‘मोक्ष’ हिंदू स्मशानभूमीकडे नेली जाणार असल्याचे मोन्सेरात कुटुंबीयांच्या वतीने कळविले आहे.

सावंत मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री

जुलै २०१९ मध्ये भाजपमध्ये सामील झालेल्या काँग्रेसच्या दहा आमदारांमध्ये त्याही होत्या. पक्ष विलिनीकरणानंतर त्यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. त्यांनी महसूल, माहिती-तंत्रज्ञान, कामगार आणि रोजगार मंत्री म्हणून काम पाहिले. विशेष बाब म्हणजे, सावंत यांच्या मंत्रिमंडळातील त्या एकमेव महिला मंत्री राहिल्या. ताळगाव मतदारसंघातून निवडून आलेल्या त्या पहिल्या महिला आमदार होत्या.

जेनिफर मोन्सेरात यांच्या निधनामुळे मला अत्यंत दुःख झाले आहे. तीनवेळा आमदार म्हणून त्यांनी ताळगावच्या मतदारसंघातील जनतेची तसेच मंत्री बनून अत्यंत निष्ठेने आणि संवेदनशीलतेने गोव्याचीही सेवा केली. दुःखाच्या या कठीणप्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि असंख्य हितचिंतक यांच्याप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो!

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

जेनिफर मोन्सेरात यांच्या अकाली निधनामुळे मला अतीव दुःख झाले आहे. आज गोव्याने एक संवेदनशील लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या सेवेसाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित करणारी महिला गमावली आहे. त्यांचा स्नेहभाव, जिद्द आणि आपल्या मतदारसंघाप्रती असलेली अटळ निष्ठा सदैव स्मरणात राहील. - विश्वजीत राणे, आरोग्य व नगरनियोजन मंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

Mapusa: म्‍हापशात विक्रेत्यांचा रस्त्यावर 'कब्जा'; सगळीकडे अतिक्रमण, बेशिस्‍त पार्किंग; वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा

Surya Gochar 2026: नोकरदारांना प्रमोशन अन् व्यापाऱ्यांना बंपर नफा! सूर्याचं नक्षत्रांतर 5 राशींसाठी ठरणार लकी; काठोकाठ भरणार तिजोरी

SCROLL FOR NEXT