jennifer monserrat  dainik gomantak
गोवा

Goa News: अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी जेनिफर मोन्सेरात यांना चपराक

बेकायदा बांधकाम नियमित करण्याच्या गोवा कायद्याखाली केलेला अपिल अर्ज 60 दिवस उलटल्यानंतर केल्यास त्याला माफ करण्याचा महसूलमंत्र्यांना कायद्यात अधिकार नाही.

दैनिक गोमन्तक

Goa News: बेकायदा बांधकाम नियमित करण्याच्या गोवा कायद्याखाली केलेला अपिल अर्ज 60 दिवस उलटल्यानंतर केल्यास त्याला माफ करण्याचा महसूलमंत्र्यांना कायद्यात अधिकार नाही.

माजी महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी अधिकार वापरून बोरी येथील बांधकाम मालक फ्रान्सिस्को फर्नांडिस यांच्या विलंब झालेल्या अपिलास परवानगी देण्याचा आदेश दिला होता,

तो मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्दबातल ठरविला आहे. अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी खंडपीठाने माजी महसूलमंत्र्यांना चपराक दिली आहे.

उच्च न्यायालयासमोर बोरी येथील सांतान रॉड्रिग्ज या याचिकाकर्त्याने 13 सप्टेंबर 2006 रोजी बोरीच्या सरपंचांकडे प्रतिवादी असलेल्या फर्नांडिस या रहिवाशाने सर्व्हे क्रमांक 166/1 या मालमत्तेवर केलेल्या बेकायदेशीर बांधकामाविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

प्रतिवादी मालकाने दुरुस्तीच्या नावाखाली बेकायदेशीरपणे सिमेंट काँक्रिटचे बांधकाम केलेल्याचे तक्रारीत नमूद केले होते. कायदेशीर प्रक्रियेनंतर पंचायत उपसंचालकांनी 19 जुलै 2010च्या आदेशाद्वारे बांधकाम मालकास बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचे निर्देश दिले होते.

उच्च न्यायालयात दिले होते आव्हान

फोंडा उपजिल्हाधिकाऱ्यांकडे फर्नांडिस यांनी बांधकाम नियमित करण्यासाठी 16 ऑक्टोबर 2018 रोजी अर्ज केला होता तो फेटाळण्यात आला होता.

सुमारे दोन वर्षे व चार महिन्यांच्या विलंबानंतर रॉड्रिग्ज यांनी तत्कालीन महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात (ॲपेलेट अधिकारिणी) यांच्यासमोर उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला आव्हान दिले होते.

रॉड्रिग्ज यांच्या आव्हान अर्जाला 60 दिवसांपेक्षा अधिक काळ विलंब (2 वर्षे 4 महिने) झाला होता. त्यामुळे अर्जाला परवानगी देण्याचा मंत्र्यांचा हा आदेश कायद्याचे उल्लंघन करणारा असल्याचे नमूद करून त्याला याचिकादार सांतान रॉड्रिग्ज यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Plastic Waste Management: बहुपदरी प्लास्टिक पॅकेजिंगवर आता 'डिपॉझिट रिफंड' अनिवार्य करा; गोवा सरकारची 'सीपीसीबी'कडे शिफारस

Asian Games 2026: हॅप्पी बर्थडे चॅम्पियन! लव्हलिना बोर्गोहेनने वाढदिवसाच्या दिवशी जिंकले ‘गोल्ड’; महिला बॉक्सिंगमध्ये भारताला 12 वर्षांनंतर सुवर्ण यश

Goa Water Conservation: गोव्यात पाणीटंचाईची चिंता नको; मे-जूनपर्यंत पुरेल साठा, फळदेसाईंचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

SCROLL FOR NEXT