Jeet Arolkar Dainik Gomantak
गोवा

Babasaheb Ambedkar Statue: चोपडे सर्कलजवळ उभारणार डॉ. आंबेडकरांचा भव्‍य पुतळा! आमदार आरोलकर यांची घोषणा

Jeet Arolkar: आमदार आरोलकर यांनी एससी समाजाला इतर समाजांच्या बरोबरीने पुढे नेण्‍याचा निर्धार व्यक्त केला. हा मेळावा मतांसाठी नसून संघटनेसाठी आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: मांद्रे मतदारसंघात प्रथमच आयोजित भव्य अनुसूचित जाती (एससी) समाज मेळाव्यात आमदार जीत आरोलकर यांनी दलित समाजाच्या प्रगतीसाठी अनेक घोषणा करत एकतेचा संदेश दिला. तसेच चोपडे सर्कल येथे राज्‍यघटनेचे शिल्‍पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्याची ग्वाही दिली. त्‍यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला.

आमदार आरोलकर यांनी एससी समाजाला इतर समाजांच्या बरोबरीने पुढे नेण्‍याचा निर्धार व्यक्त केला. हा मेळावा मतांसाठी नसून संघटनेसाठी आहे. कोणतेही भय नको, घरांच्या हक्कासाठी आम्ही तुमच्‍यासोबत आहोत, असे ते म्हणाले.

मेळाव्यास हास्य सम्राट पृथ्वीराज प्रताप कांबळे, समिती अध्यक्ष रामनाथ पवार, सरपंच हेमंत चोपडेकर यांच्‍यासह विविध भागातील एससी बांधवांची मोठी उपस्थिती होती.

दरम्‍यान, शिक्षण, क्रीडा आणि पारंपरिक व्यवसायात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बंधू-भगिनींचा यावेळी सन्मान करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मांद्रेत भव्यदिव्य पद्धतीने साजरी करण्याचे आणि १४ एप्रिलपूर्वी पुतळा उभारण्याचे आश्वासन आमदारांनी दिले. उपस्‍थित मान्‍यवरांनीही विचार मांडले.

सन्‍मान सोहळ्‍याचे मानकरी

शिक्षण आणि क्रीडा : आनंद फरास, बाबाजी फरास, धनेश फरास, निहा फरास, शीतल केरकर, स्वीटी मांजरेकर, गुरुदास मांद्रेकर, सलोनी मांद्रेकर, सुमित चोपडेकर, ओमकार चोपडेकर, वामन चोपडेकर, सचिन पार्सेकर, ऐश्वर्या पार्सेकर, सिद्धेश पार्सेकर, वैजयी पवार, सिमरन हरमलकर, रश्मी तळेकर, करुणा विर्नोडकर. सुपे-पाटले तयार करणे : इंदूमती फरास, तारामती फरास, जयश्री जाधव, लक्ष्मी हरिजन, सत्यभामा हरिजन, कविता मांद्रेकर, विमल मांदेकर, चंद्रिका चोपडेकर, जानू चोपडेकर, चंद्रावती पार्सेकर, श्रीमती पार्सेकर, माधुरी पालयेकर, धनश्री पालयेकर, सुभद्रा, रुक्मिणी, रोहिण, पार्वती आगरवाडेकर, मीनाक्षी आगरवाडेकर, लक्ष्मी पवार, दीपाली पवार, आरती पवार, देवकी पवार, लक्ष्मी एल. पवार, वैशाली पवार, लक्ष्मी पवार, मंगला सिंग, सुनीता पवार, सुचिता पवार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vehicle Theft Case: मायणा कुडतरी पोलिसांची मोठी कारवाई, वाहन चोरीप्रकरणी दोघांना ठोकल्या बेड्या; 5 दुचाकीही जप्त

ऑफिसरसाहेब गोत्यात! नवरा रुममध्ये गर्लफ्रेंडसोबत असताना अचानक बायकोची एन्ट्री, रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा Watch Video

पाकिस्तानात हिंदू मुलीचं अपहरण, जबरदस्तीनं धर्मांतर करुन मुस्लिम वृद्धाशी लावलं लग्न; कोर्टानं दिला 'हा' निर्णय

Viral Video: सायकलचं चाक लावून बाईकला जोडला पलंग, पठ्ठ्यानं झोपून चालवली गाडी; बिहारी तरुणाचा जुगाड तूफान व्हायरल

Viral Post: 'ब्रेकअप झालंय, कामात मन लागत नाही!' सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं केलेला मेल व्हायरल, पठ्ठ्याला मिळाली 10 दिवसांची सुट्टी

SCROLL FOR NEXT