Jeep-two-wheeler accident in Panaji, one killed
Jeep-two-wheeler accident in Panaji, one killed Dainik Gomantak
गोवा

पणजीत जीप-दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू

दैनिक गोमन्तक

कांपाल-पणजी येथे जीपने दुचाकीला ठोकरल्याने अपघात झाला आहे. या अपघाता दोन जण गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी जखमींना गोमेकॉ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान मारुती सावंत (मिरामार) या 69 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. त्यांची पत्नी गंभीर जखमी आहे. अपघात (Accident) झाल्याने घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ वाहतुक कोंडी झाली होती.

दरम्यान, म्हापसा कदंब बसस्थानकावर पार्क केलेल्या खासगी बसने अचानक खाली उतरत तीन दुचाकींसह एका महिलेला धडक दिली. अपघातात महिला किरकोळ जखमी झाली आहे. यात दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, आंबेली-वेळ्ळी येथे मुलीने बापाची हत्या (Murder) केल्याची घटना घडली आहे. मुलीची मानसिक स्थिती ठीक नसल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी आणि संबंधीत पालकांनी दिली आहे. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांसह कुंकळ्ळी पोलिस घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आरोपी मुलीची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे तीने रागाच्या भरात हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. मुलीचे मेडीकल चेकअप करून पोलिस (police) पुढील कारवाई करणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amthane Dam Water : ‘आमठाणे’त अखेर पाणी; जलस्रोत खात्याकडून उपाययोजना

Goa Weather And Heatwave Update: अवकाळीनंतर पारा घटला; गोव्यात कसे राहणार हवामान? जाणून घ्या

Supreme Court: 11,600 झाडे तोडण्याविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयात; केंद्र अन् राज्य सरकारकडे मागितले उत्तर

Goa Today's Live Update: थिवीत रविवारी तीन तास वीज पुरवठा विस्कळीत राहणार

Goa Crime News: शारीरिक संबधास नकार दिल्याने पत्नीचा खून; पाच वर्षानंतर पती दोषी

SCROLL FOR NEXT