Jayesh Chodankar Murder Case Dainik Gomantak
गोवा

Jayesh Chodankar Case: मोठी बातमी! जयेश चोडणकर मृत्यू प्रकरणातील संशयितांचा उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल

पोलिसांना या प्रकरणात येत्या सोमवारी बाजू मांडण्याचे निर्देश

Kavya Powar

Jayesh Chodankar Murder Case: काही दिवसांपूर्वी चिंबल-मेरशी जंक्शनवर पार्किंगवरून झालेल्या वादानंतर जयेश चोडणकर (रा. चिंबल, वय 42) याचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू अपघाती नसून घातपात असल्याचा दावा करून खुनाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली होती.

या घटनेच्या तपासानंतर पोलिसांनी हीट अँड रन तसेच मारहाणप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून कृपेश वळवईकर व पोलिस प्रितेश हडकोणकर यांना अटक करून ताब्यात घेतले होते.

या घटनेत आता मोठी माहिती समोर आली आहे. संशयित आरोपी कृपेश वळवईकर आणि प्रितेश हडकोणकर यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांना या प्रकरणात येत्या सोमवारी बाजू मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, जयेश चोडणकर खून प्रकरणातील संशयितांची लाय डिटेक्टर चाचणी करण्यासाठी ओल्ड गोवा पोलिसांनी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT