Cm Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Valpoi News : कामधेनू योजनेतील गायी गोठ्यात बांधणे बंधनकारक : मुख्यमंत्री

Valpoi News : रस्त्यांवर गायी फिरताना आढळल्यास संबंधितांवर होईल कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi News : वाळपई , सरकारतर्फे ज्यांनी कामधेनू योजनेअंतर्गत गायी खरेदी केलेल्या आहेत. त्यांचे पालन-पोषण आपल्या गोठ्यातच केले पाहिजे.

अशा योजनेच्या गायी जर रस्त्यांवर आढळल्यास त्यांची योजना बंद करून अन्य गायीदेखील सरकार ताब्यात घेणार आहे, तसे निर्देशही पशुसंवर्धन खात्याला दिले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी केले.

वाळपई-नाणूस येथील अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रात भेटीवेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील इशारा दिला आहे.

केंद्राचे अध्यक्ष हनुमंत परब, खजिनदार लक्ष्मण जोशी, सल्लागार डॉ. वल्लभ धायमोडकर, माजी उपसभापती नरहरी हळदणकर यांची यावेळी उपस्थिती होती. हनुमंत परब यांनी प्रास्ताविक केले. सावंत यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मानही करण्यात आला. सावंत यांनी सप्तगोमाता मंदिराला भेट देऊन गायींची व श्रीकृष्ण मूर्तीची मनोभावे पूजा केली.

राज्यात गोशाळांमुळे भटक्या गोवंशांचे पालन होते आहे. गोवंश पालन करताना लोकांचाही त्रास गोशाळांना सोसावा लागतो आहे. गोशाळेत गो-निर्मिती उत्पादनासाठी जीएसटी कर रद्दतेसाठी प्रयत्न करणार आहे.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

अपघातांची वाढती संख्या

दिवसेंदिवस भटक्या गुरांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे राज्यात गुरांवर दुचाकींची धडक बसून अपघातांची संख्या चिंताजनक आहे.

रस्त्यांवरील अपघातात माणसांचा जीव जातो आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार कठोर कारवाई करण्यासाठी तयार असणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT