Mandrem Police Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: हरमल येथे नऊ लाखांच्या अमली पदार्थांसह इस्रायली नागरिकाला अटक

Goa Crime News:अटक नार याकाव याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, अधिक तपास सुरु आहे.

Pramod Yadav

Goa Crime News

अमली पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या इस्रायली नागरिकाला हरमल येथे अटक करण्यात आली आहे. मांद्रे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी (दि. 23 मार्च) ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी त्याच्याकडून 136 ग्रॅम सुखलेल्या अळंबी ज्यात अमली पदार्थ सायलोसायबिन, 132 ग्रॅम सायलोसिबिनची पावडर व 140 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

नार याकाव (वय 27, रा. हरमल, मूळ इस्राईल) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

नार याकावकडून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात 8,72,000 लाख मूल्य असल्याचे समोर आले आहे.

मांद्रे पोलिसांना संशयित आरोपी शनिवारी सायंकाळच्या सुमारास हरमल येथे अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली.

उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांच्या सुचनेनुसार, पेडण्याचे एसडीपीओ जिवबा दळवी आणि मांद्रेचे पोलिस निरीक्षक शेरीफ जॅकस् यांच्या नेतृत्वाखाली टीम तयार करण्यात आली.

संशयित व्यक्ती घटनास्थळी येताचा त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे 136 ग्रॅम सुखलेल्या अळंबी ज्यात अमली पदार्थ सायलोसायबिन, 132 ग्रॅम सायलोसिबिनची पावडर व 140 ग्रॅम गांजा असा साठा आढळून आला.

संशयिताविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटक नार याकाव याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT