Israel-Hamas War Dainik Gomantak
गोवा

Israel-Hamas War: देश प्रथम, सुट्टी नंतर! गोव्यातील इस्रायली पर्यटक परताहेत मायदेशी

देशवासीयांच्या मदतीसाठी संरक्षण दलात स्वयंसेवा करण्यासाठी पर्यटक परतत आहेत.

Pramod Yadav

Israel-Hamas War: इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेला संघर्ष वाढत असताना, गोव्यातील इस्रायली पर्यटक मायदेशी परतत आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर या कठीण प्रसंगात कुटुंबासोबत राहण्यासाठी आणि देशवासीयांच्या मदतीसाठी संरक्षण दलात स्वयंसेवा करण्यासाठी पर्यटक परतत आहेत.

गोव्यातील चबाड हाऊसमध्ये बुधवारी अनेक इस्रायली नागरिक एकत्र आले होते, त्यांनी उड्डाण वेळापत्रकांबद्दल चौकशी केली. इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षामुळे तेल अवीवची काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

इटामार (27), इस्रायल संरक्षण दलातील माजी सैनिक आहे. इटामार गाझा पट्टीपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या इस्रायलच्या दक्षिणेकडील जिल्ह्यातील सेडरॉट येथे राहतो. इटामार गोव्यातून इस्रायला जाणाऱ्या पहिल्या फ्लाइटची वाट पाहत आहे.

"मी एका आठवड्यापूर्वी इथे आलो होतो, पण मला आता परत जायचं आहे. मला माझ्या देशाची आणि देशवासीयांना मदत करायची आहे...इथे बसून समोर येणाऱ्या हिंसाचाराच्या बातम्या पाहणे त्रासदायक आहे," असे इटामार याने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

तसेच, इस्रायलमधील सोशल मीडिया मॅनेजर तामार शहार (26) तिच्या वडिलांशी फोनवर बोलत होती, यावेळी तिला कॉलच्या मध्येच सायरन वाजल्याचा आवाज आला.

शहार तीन आठवड्यांपूर्वी सुट्टीसाठी गोव्यात आली होती, गुरुवारी तिने गोव्याहून अबू धाबीला उड्डाण करुन पुढे तेल अवीवला कनेक्टिंग फ्लाइट घेणार होती, परंतु तिची कनेक्टिंग फ्लाइट रद्द झाल्यानंतर ती गोव्यात अडकून पडली आहे.

चबाड हाऊसमध्ये बॅग भरून डुडी नावाचा एक मानसशास्त्रज्ञ दाखल झाला. डुडी मायदेशी परतून सैन्यात भरती होण्यासाठी उत्सुक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

Goa Live News Updates: ऑनलाईन फ्रॉडमधून ३ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

SCROLL FOR NEXT