Football tournament Dainik Gomantak
गोवा

ISL: गोव्यात रात्रीस रंगे फुटबॉल खेळ

बायो-बबल निर्बंधामुळे फुटबॉलप्रेमींना (Football fan)मात्र प्रत्यक्ष स्टेडियमवर जाऊन ‘लेट नाईट’ फुटबॉलच्या आनंदास मुकावे लागेल.

दैनिक गोमन्तक

आगामी ISL फुटबॉल स्पर्धेत या आठवडाच्या अखेरीस होणाऱ्या दोन लढतींपैकी एक लढत रात्री उशिरा खेळविण्याचे नियोजन आहे. याबाबत वेळापत्रकाची अधिकृत घोषणा झाली आहे. ‘लेट नाईट’ (Late night)सामन्यांच्या वेळापत्रकावर शिक्कामोर्तब झाला आहे. एकंदरीत भारतीय फुटबॉलमध्ये आता ‘लेट नाईट’ संस्कृती रूजू होताना दिसून येतेय. या वर्षी एप्रिलमध्ये गोव्यात AAFC चँपियन्स लीग सामने झाले होते. रमजान ईदमुळे बहुतेक सहभागी देश आखातातील असल्याने रात्रीचे सामने उशिरा झाले होते. आता आयएसएलद्वारे भारतात ‘लेट नाईट’ फुटबॉल पदार्पणास सज्ज झाले आहे. युरोपात रात्री उशिरा रंगणारा फुटबॉल खेळ लोकप्रिय आहे. मात्र, कोविडमुळे ISL चा सलग दुसरा हंगाम गोव्यात रिकाम्या स्टेडियमवर खेळला जाईल. बायो-बबल निर्बंधामुळे फुटबॉलप्रेमींना मात्र प्रत्यक्ष स्टेडियमवर जाऊन ‘लेट नाईट’ फुटबॉल आनंद घेता येईल.

आगामी इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेसाठी कोलकात्याच्या एससी ईस्ट बंगाल (SC East Bengal) संघाने गोमंतकीय बचावपटू डॅनियल गोम्स (Daniel Gomes) याच्या करारावर बुधवारी शिक्कामोर्तब केले. 2021-22 मोसमासाठी ईस्ट बंगालने करारबद्ध केलेला तो गोव्यातील पाचवा फुटबॉलपटू आहे. ईस्ट बंगालने यापूर्वीच रोमियो फर्नांडिस, सेरिनियो फर्नांडिस, जॉयनर लॉरेन्स व आदिल खान या गोमंतकीयांना करारबद्ध केले आहे. डॅनियल गतमोसमात गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत साळगावकर एफसी संघातर्फे खेळला होता. ‘‘आयएसएल स्पर्धेतील पदार्पणाच्या मोसमाबाबत मी आशावादी आहे. संघातील वरिष्ठ खेळाडूंकडून शिकण्यावर भर राहील,’’ असे डॅनियल याने सांगितले. डॅनियल 24 वर्षांचा असून सेंटर-बॅक जागी खेळतो. 2015 साली वयाच्या 18व्या वर्षी तो साळगावकर एफसीच्या 19 वर्षांखालील संघात दाखल झाला, तीन वर्षांनंततर त्याला साळगावकर एफसीच्या सीनियर संघात बढती मिळाली.

नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती

आगामी मोसमापूर्वी ईस्ट बंगाल संघाने ब्रिटिश प्रशिक्षक रॉबी फॉलर यांच्या करार सामंजस्याने संपुष्टात आणला आहे. त्यांच्या जागी आता स्पॅनिश मान्युएल (मानोलो) डायझ नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी ते रेयाल माद्रिद कास्तिला संघाचे प्रशिक्षक होते त्यांच्यापाशी प्रशिक्षणातील दोन दशकांचा गाढा अनुभव आहे. ते 53 वर्षांचे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT