FC Goa, Manolo Marquez Dainik Gomantak
गोवा

ISL 2024-25: दुसऱ्या क्रमांकासाठी महत्वाचा सामना, FC Goa भिडणार धोकादायक जमशेदपूरला

FC Goa VS Jamshedpur FC: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत ‘शिल्ड’ पटकावण्याच्या शर्यतीत मोहन बागानने दहा गुणांची मजबूत आघाडी घेतली आहे.

Sameer Panditrao

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत ‘शिल्ड’ पटकावण्याच्या शर्यतीत मोहन बागानने दहा गुणांची मजबूत आघाडी घेतली आहे. एफसी गोवाचाही दावा असून जमशेदपूर एफसीही गुणतक्त्यात प्रगती साधण्यास इच्छुक आहे. या अनुषंगाने रविवारी (ता. २) होणारा सामना दुसऱ्या क्रमांकासाठी महत्त्वाचा ठरेल.

जमशेदपूर एफसी व एफसी गोवा यांच्यातील सामना रविवारी जमशेदपूर येथील जेआरडी टाटा क्रीडा संकुलात खेळला जाईल. सध्या एफसी गोवाचे ३३, तर जमशेदपूरचे ३१ गुण आहेत. शनिवारी कोलकता येथे मोहम्मेडन स्पोर्टिंगला ४-० फरकाने नमविल्यामुळे अग्रस्थानावरील मोहन बागानच्या खाती ४३ गुण जमा झाले आहेत.

घरच्या मैदानावर खलिद जमिल यांच्या मार्गदर्शनाखालील जमशेदपूर एफसी धोकादायक ठरतो, जमशेदपूरमध्ये खेळलेल्या सलग पाच सामन्यांत त्यांनी चार विजय व एक बरोबरी नोंदविली आहे. ओळीने बारा सामने अपराजित असलेल्या मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवास सावध राहावे लागेल. गोव्यातील संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून यंदा स्पर्धेतील अवे मैदानावर त्यांनी पराभव पत्करलेला नाही.

जमशेदपूरने मागील लढतीत नवी दिल्ली येथे पंजाब एफसीला हरविले होते, मात्र त्यापूर्वी त्यांना तळाच्या हैदराबादने पराभूत केले होते ही बाब नजरेआड करता येणार नाही. १७ लढतीत जमशेदपूरने १० विजय व एक बरोबरी नोंदविली असून सहा पराभव पत्करले आहेत. एफसी गोवाने नऊ विजय, सहा बरोबरी व दोन पराभव अशी कामगिरी केली आहे.

मैदानात उतरण्यापूर्वी...

पहिल्या टप्प्यात १७ सप्टेंबर २०२४ रोजी फातोर्डा येथे जमशेदपूर एफसीची एफसी गोवावर २-१ फरकाने मात

उभय संघांत १५ सामने, त्यात एफसी गोवाचे ८, जमशेदपूर एफसीचे ५ विजय, २ बरोबरी

एफसी गोवा १२ सामने अपराजित (८ विजय, ४ बरोबरी)

अवे मैदानावर सलग ८ सामने अपराजित (४ विजय, ४ बरोबरी)

एफसी गोवाचे यंदा स्पर्धेतील सर्व १७ सामन्यांत गोल (एकूण ३२)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT