Ishan Badgujar Death Case Dainik Gomantak
गोवा

Ishan Badgujar Death Case: 'ड्रग्ज कॉकटेल'ने घेतला जीव, आता 'ते' 8 मित्र गोवा पोलिसांच्या रडारावर; ईशान बडगुजर मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Ishan Badgujar Culpable Homicide Case: वागातोर येथे ईशान बडगुजर (२१, इंदूर-मध्यप्रदेश) या युवकाचा ड्रग्‍ज सेवनाने मृत्‍यू झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाल्‍यानंतर पोलिसांनी आता या प्रकरणी ‘सदोष मनुष्यवध’ म्हणून गुन्हा नोंदवण्याची तयारी सुरू केली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: वागातोर येथे ईशान बडगुजर (२१, इंदूर-मध्यप्रदेश) या युवकाचा ड्रग्‍ज सेवनाने मृत्‍यू झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाल्‍यानंतर पोलिसांनी आता या प्रकरणी ‘सदोष मनुष्यवध’ म्हणून गुन्हा नोंदवण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच ईशानसोबत असलेल्या त्याच्या आठही मित्रांना पोलिसांनी तातडीने चौकशीसाठी गोव्यात बोलावले आहे.

''ड्रग्ज कॉकटेल''मुळे ईशानचा जीव गेल्याचे स्‍पष्‍ट झाल्याने, त्याच्या मित्रांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच त्‍यांनी ड्रग्‍ज कोठून घेतले, याचा शोध घेतला जाईल. ईशानसोबत असलेल्या त्याच्या आठही मित्रांना पोलिसांनी तातडीने चौकशीसाठी गोव्यात बोलावले आहे. पोलिसांनी या मित्रांशी संपर्क साधून त्यांना हणजूण पोलिसांत हजेरी लावण्यास संगितले आहे. हे सर्व तरुण उच्चभ्रू कुटुंबातील असून नामांकित महाविद्यालयांचे विद्यार्थी आहेत. ते गोव्यात हजर झाल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे.

इशान बडगुजर हा नऊ मित्रांसह हणजूण-वागातोर परिसरातील एका (३ एप्रिल) पार्टीत सहभागासाठी आला होता. मात्र, ऐनवेळी ती पार्टी रद्द झाल्याने या मित्रांनी आसगावात भाड्याने घेतलेल्या ‘व्हिला’वरच मद्यपान केले. नंतर मध्यरात्री हा गट वागातोर येथील एका प्रसिद्ध रेस्टॉरंट-क्लबमध्ये गेला. तिथे नाच-गाणी आणि मद्यपान व जेवण करून बाहेर पडल्यानंतर, अचानक इशानला अस्वस्थ वाटू लागले. मित्रांनी त्याला दोन खासगी रुग्णालयांत नेले, मात्र प्रकृती खालावल्याने त्याला म्हापसा जिल्हा रुग्णालयात हलवले. तिथे डॉक्टरांनी त्याला ‘मृत’ घोषित केले.

आठही मित्रांना गोव्यात पाचारण

इशानसोबतच्या आठही मित्रांना पोलिसांनी तातडीने चौकशीसाठी गोव्यात बोलावले आहे. मंगळवारी पोलिसांनी या मित्रांशी संपर्क साधून त्यांना हणजूण पोलिसांत हजेरी लावण्यास संगितले आहे. हे सर्व तरुण उच्चभ्रू असून विद्यार्थी आहेत. त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, ज्या ‘रेत’ क्लबच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली, त्या क्लबमधील काही कर्मचाऱ्यांचे जबाबही पोलिसांनी घेतले आहेत.

कायदेशीर पेच, पोलिसांची भूमिका

इशानचा मृत्यू झाला तेव्हाच त्याच्या मित्रांची ड्रग्स चाचणी का केली नाही, असा प्रश्न केला जात होता. मात्र,कायदेशीर तरतुदींनुसार ठोस पुराव्याविना कोणास वैद्यकीय चाचणीसाठी सक्ती करता येत नाही. ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणीही संबंधित व्यक्ती रक्ताचे नमुने देण्यास नकार देऊ शकते व पोलिस त्यांच्यावर सक्ती करू शकत नाहीत.

स्थानिक पेडलर्स रडारवर

हणजूण आणि वागातोर पट्ट्यातील स्थानिक पेडलर्सनी हे ड्रग्ज पुरवले का, याचा शोध पोलिस घेत आहेत.

पार्टीच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का आणि वैद्यकीय मदत मिळण्यास उशीर झाला का, याबाबत चर्चा सुरू आहे. (पोलिस मात्र वैद्यकीय मदतीला उशीर झाल्याचा दावा फेटाळताहेत)

दोषी आढळणाऱ्यांवर ‘एनडीपीएस’ अंतर्गत गुन्हे दाखल केले जातील आणि हलगर्जीपणा करणाऱ्यांवरही कारवाई होईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

गोव्यातील पर्यटन पट्ट्यात ड्रग्जची सहज उपलब्धता आणि अंमलबजावणीतील त्रुटी पुन्हा एकदा या घटनेमुळे चव्हाट्यावर आल्या आहेत.

ते जबाब ठरले खोटे

१ घटनेनंतर सुरुवातीला पोलिसांनी जेव्हा ईशानच्या मित्रांचे जबाब नोंदवले होते, तेव्हा सर्वांनी ‘आम्ही केवळ मद्यप्राशन केले होते, अमली पदार्थांचे सेवन केले नाही’, असा दावा केला होता.

२ मात्र, वैद्यकीय अहवालाने मित्रांचा हा दावा फोल ठरवला असून आता तपासाची सुई त्यांच्याकडे वळली आहे.

३ ईशानने हे अमली पदार्थ कुठून आणले? त्याच्यासोबत त्याच्या मित्रांनीही ड्रग्ज घेतले होते का? ईशानची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला मदत का मिळाली नाही? या प्रश्नांचा शोध पोलिस घेतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT