Dona Paula Jetty Dainik Gomantak
गोवा

Dona Paula Jetty: दोना पावला जेटीवर प्रत्येकाची ओळख पटविणे शक्य आहे का? - बाबूश मोन्सेरात

शुल्क आकारणीच्या मुद्द्यावर महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांचा सवाल

गोमन्तक डिजिटल टीम

Dona Paula Jetty "दोना पावला जेटीवर पर्यटकांना शुल्क आकारले जाणार आहे. या शुल्क आकारणीतून स्थानिकांना वगळण्यात येणार असले तरी ते ओळखणार कसे?" असा सवाल महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी केला आहे.

दैनिक गोमन्तकशी बोलताना ते म्हणाले की, "दोना पावला जेटीच्या उद्‍घाटनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आपल्याला होते. परंतु आपण आजारी असल्याने गेलो नाही."

"जेटी पर्यटकांना खुली झाली ही चांगली बाब आहे. परंतु स्थानिक नागरिकांना ज्या पद्धतीने शुल्क आकारले जाणार नाही, असे म्हटले आहे ते आपणास अद्याप समजले नाही. कारण स्थानिकाबरोबर कोणी आल्यास प्रत्येकाची ओळख पटवणार काय?

हजारो पर्यटकांबरोबर शेकडो नागरिकही त्याठिकाणी जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाची ओळख पटविणे शक्य आहे का?" असा सवालही त्यांनी केला.

दोना पावला जेटी डिसेंबरमध्ये खुले करण्याची तयारी पर्यटन खात्याने केली होती. परंतु त्यानंतर जानेवारी महिना गेला, अखेर पर्यटन मंत्री रोहन खंवटेच्या वाढदिवसाचे औचित्य साधला गेले आणि ती जेटी पर्यटकांसाठी खुली झाली.

दरम्यानच्या काळात मात्र दोना पावला जेटीपरिसरात विविध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मात्र वेगवेगळी चर्चा सुरू होती. जेटी खुली होत नसल्यामुळे तेथील व्यवसायिकांना मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याकडे वारंवार त्याविषयी विचारणा सुरू केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT