Ironman 70.3 Goa Dainik Gomantak
गोवा

Ironman 70.3 Goa: पुन्हा गोव्यात रंगणार आयर्नमॅनचा थरार! ट्रायथलॉन स्पर्धेची तारीख जाहीर

जगातील सर्वात अवघड मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत पोहणे, धावणे आणि सायकल चालवणे अशा गोष्टींचा समावेश असतो.

Pramod Yadav

Ironman 70.3 Goa: गोव्यात होणाऱ्या आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेची तारीख जाहीर करण्यात आली असून, यावेळी तीस देशातील 1600 स्पर्धेक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. जगातील सर्वात अवघड मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत पोहणे, धावणे आणि सायकल चालवणे अशा गोष्टींचा समावेश असतो.

मागील वर्षीपासून ही स्पर्धा कायमस्वरुपी गोव्यात होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री सावंत यांनी केली होती. यावर्षी स्पर्धेचा थरार गोव्यात अनुभवायला मिळणार आहे.

आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेचे 113 किमी अंतर आठ तास आणि तीस मिनिटात पूर्ण करण्याचे आवाहन स्पर्धेकांसमोर असते. यावेळी गोव्यात 08 ऑक्टोबर रोजी गोव्यात ही स्पर्धा होणार आहे. अशी घोषणा करण्यात आली आहे.

मिरामार येथे स्पर्धेचा प्रारंभ होणार असून, यात 1.9 किमी पोहणे, 90 किमी सायकल चालवणे आणि 21.1 किमी धावणे यांचा समावेश आहे.

आयर्नमॅन स्पर्धा जगातील एक प्रसिद्ध स्पर्धा असून, स्पर्धेक दोन वर्षापासून या स्पर्धेसाठी तयारी करत असतात. स्पर्धेसाठी 1,200 लोक सहकार्य करतील यात 700 स्वयंसेवक असतील. प्रवासात स्पर्धेकांसाठी 21 टन बर्फे आणि 23,000 लिटर पाणी पुरवले जाणार आहे.

अपातकालिन परिस्थितीत मदतीसाठी मार्गात अनेक मेकॅनिक देखील सज्ज ठेवले जाणार आहेत. सायकल चालकांना काही अडचण आल्यास त्यांना तांत्रिक सहाय्य तंत्रज्ञ करतील. तरीही सायकलची काळजी स्वत: स्पर्धकाला घ्यावी लागते असा या स्पर्धेचा नियम आहे.

मागील वर्षी झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी निहाल बेग याने बाजी मारली होती. एरोस्पेस अभियंता असलेल्या निहालने गतविजेत्या भारतीय लष्कराच्या बिस्वरजित सायखोम यांना मागे टाकत हा किताब आपल्या नावे केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT