IRCTC Valentine in Goa Tour Package Dainik Gomantak
गोवा

तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत गोव्यात साजरा करा व्हॅलेंटाईन... IRCTC ने दिलेय खास पॅकेज

4 रात्री, 5 दिवसांचे व्हॅलेंटाईन इन गोवा टूर पॅकेज

Akshay Nirmale

IRCTC Valentine in Goa Tour Package: गोवा हे पर्यटनासाठीचे आघाडीचे डेस्टिनेशन आहे. या पर्यटनात हनिमूनसाठी येणाऱ्या कपल्सची संख्याही मोठी आहे. देशभरातून अनेक कपल्स हनिमूनसाठी दरवर्षी गोव्यात येत असतात.

तर व्हॅलेंटाईन डे साठीही गोव्यात येणारी कपल्स आहेत. आता अशाच कपल्ससाठी भारतीय रेल्वेच्या IRCTC कंपनीने खास पॅकेज आणले आहे.

त्यामुळे ज्यांना स्वतःच्या प्रिय व्यक्तीसोबत गोव्यात व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा आहे, त्यांच्यासाठी हे पॅकेज फायदेशीर ठरू शकते. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC ने नवीन वर्षात खास व्हॅलेंटाईन इन गोवा टूर पॅकेज जाहीर केले आहे.

4 रात्री आणि 5 दिवसाचे हे पॅकेज आहे. यात तुम्हाला सर्व प्रकारच्या सुविधा मिळतील, जेणेकरून प्रवासाचा अनुभव खूप खास असेल. या पॅकेजसाठी बुकिंगदेखील सुरु झाले आहे.

फेब्रुवारीमध्ये ही टूर असणार आहे. पण, त्याचे बुकिंग तुम्ही आतापासूनच करू शकता. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार IRCTC ने यासाठी विशेष व्यवस्था केली आहे.

हे टूर पॅकेज 4 रात्री आणि 5 दिवसांचे आहे. IRCTC व्हॅलेंटाइन इन गोवा टूर पॅकेजमध्ये फ्लाइट तिकीटाचे भाडे, हॉटेल, कॅब, खाद्यपदार्थ आणि पेये, पर्यटन स्थळांपर्यंत वाहतूक, कर आणि गाईड यांचा समावेश असेल. या दौऱ्याची सुरुवात गुवाहाटी येथून होणार आहे.

या दौऱ्याचा कालावधी 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी असा आहे. यासाठी गुवाहाटीहून गोव्यासाठी विमान सेवेचा समावेश आहे. तुम्ही irctctourism.com वरून देखील टूर पॅकेज बुक करू शकता.

फ्लाइटच्या वेळा

12 फेब्रुवारी रोजी गुवाहाटी विमानतळावरून गोव्यासाठी 06.40 वाजता विमान उड्डाण करेल आणि 14.35 वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे, 16 फेब्रुवारी रोजी गोवा ते गुवाहाटी हे विमान 15.05 वाजता उड्डाण करेल आणि 00.05 वाजता गुवाहाटीला पोहोचेल.

खर्च

IRCTC च्या अधिकृत वेबसाइटनुसार, व्हॅलेंटाइन इन गोवा टूर पॅकेज अंतर्गत प्रति व्यक्ती किंमत:

एक व्यक्ती (सिंगल) - ₹ 39630

दोन व्यक्ती (दुहेरी) - ₹ 31210

तीन व्यक्ती (तिप्पट) - ₹ 30720

मूल (5-11 वर्षे) - ₹ 29980

मूल (2-4 वर्षे) - ₹ 29480

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT