IRCTC Special Goa Tour Package Dainik Gomantak
गोवा

'एकदा तरी गोवा ट्रीप करायचीच...' हा प्लॅन आता होणार पूर्ण! IRCTC च्या खास पॅकेजमधून मित्रांसोबत करा जीवाचा गोवा...

यामध्ये तुम्ही 3 रात्री आणि 4 दिवसांसाठी प्रवास करता येणार

Kavya Powar

IRCTC Special Goa Tour Package: आयुष्यात एकदा तरी गोवा ट्रीप करायचीच असं आपल्यापैकी अनेकांनी ठरवलेलं असतं. पण अनेकदा तो प्लॅन पूर्ण होत नाही. कधी पैशाची अडचण येते, तर कधी हॉटेल्स बजेटपेक्षा महाग असतात. पण आता तुमची गोवा ट्रिप यशस्वी होऊ शकते.

होय, कारण IRCTC एक खास पॅकेज घेऊन आले आहे. यामध्ये तुम्ही 3 रात्री आणि 4 दिवसांसाठी प्रवास करू शकता.

तुमची फ्लाइटची किंमत यामध्ये समाविष्ट केली जाईल, हॉटेल भाडे देखील यामध्ये पॅकेजमध्येच असेल. यासोबतच सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व तुम्हाला पॅकेजच्या किमतीतच मिळणार आहे. चला तर मग या पॅकेजबद्दल जाणून घ्या.

IRCTC चे हे पॅकेज ऑक्टोबरमध्ये लॉन्च होणार आहे. माहितीनुसार, 6 ऑक्टोबर 2023 ते 9 ऑक्टोबर 2023 या कालावधीत 3 रात्री आणि 4 दिवस ही टूर असणार आहे. या पॅकेजमध्ये पर्यटकांसाठी फक्त लखनऊ ते गोव्याच्या फ्लाइटची व्यवस्था करण्यात आली आहे.

यामध्ये तुम्हाला थ्री स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली जाईल. तसेच गोव्यातील पर्यटन स्थळ फिरण्यासाठी तुम्हाला एसी कार देखील दिली जाईल.

या पॅकेजमधून फिरा गोव्यातील 'ही' ठिकाणे

प्रवासादरम्यान गोव्यातील मंगेशी मंदिर, आग्वाद किल्ला, हणजूण बीच, बेंझ सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम, बॅसिलिका ऑफ बॉन जीझस चर्च, मिरामार बीच, मांडवी नदीवरील इव्हनिंग क्रूझ, बागा बीच, कांदोळी बीच आणि स्नो पार्क तुम्हाला पाहता येणार आहे.

पॅकेजची किंमत...

या टूर पॅकेजमध्ये तीन व्यक्तींसोबत राहण्यासाठी पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती 30,800/- रुपये ठेवण्यात आली आहे. त्याच वेळी, जर दोन लोक एकत्र राहत असतील तर पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती 31,200/- रुपये असेल.

जर तुम्ही एकटेच असाल तर पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती 37,700/- रुपये असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT