IRCTC Goa Tour Package Dainik Gomantak
गोवा

IRCTC Goa Tour Package: 'गोव्याच्या किनाऱ्यावर...', फिरायला जाण्याची उत्तम संधी ! वाचा एका क्लिकवर

Plan Goa Trip: तुम्ही गोव्याला भेट देण्याचा विचार करत असाल तर, आयआरसीटीसीने एक उत्तम संधी देली असुन त्याचा आनंद घ्यावा.

दैनिक गोमन्तक

तुम्ही केव्हाही गोव्याला जाण्याचा प्लॅन केव्हाही बनवू शकता.पण गोव्याला जाण्याचा सर्वोत्तम सिझन पावसाळ्यानंतर आणि उन्हाळा सुरू होण्यापूर्वीचा आहे.यावेळा तेथील हवामान अतिशय उत्तम असते. त्यामुळे तुम्ही ऑक्टोबर, नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये भटकंती करण्याचा विचार करत असाल तर गोव्याला जाण्याचा प्लॅन परफेक्ट आहे. आयआरसीटीसीने गोव्याला भेट देण्याची एक उत्तम संधी आणली आहे, ज्यामध्ये तुम्ही फक्त 25,730 रुपयांमध्ये दक्षिण ते उत्तर गोवा फिरण्याचा आनंद घेउ शकता.

गोव्यातील 'या' ठिकाणांना देऊ शकता भेट

या पॅकेजदरम्यान तुम्ही कलंगुट बीच, अंजुना बीच, वागेटोर बीच, उत्तर गोव्यातील फोर्ट अगुआडा आणि दक्षिण गोव्यातील बॅसिलिका ऑफ बॉम जीसस, मिरामार बीच, मांगुशी मंदिर, मांडोवी नदी क्रूझ या ठिकाणांना भेट देउ शकता.

टूर पॅकेजचे तपशील

पॅकेजचे नाव - अमेझिंग गोवा एअर पॅकेज

डेस्टिनेशन कवर्ड - दक्षिण आणि उत्तर गोवा

पॅकेजचा कालावधी - 4 दिवस आणि 3 रात्री

प्रवास मोड - फ्लाइट

प्रस्थान तारीख- 6 ऑक्टोबर 2022, 5 नोव्हेंबर 2022 आणि 10 डिसेंबर 2022

प्रवासाची सुरुवात- लखनऊ

टूर पॅकेजची किंमत

या पॅकेजमध्ये तुम्ही एकटे फिरणार असाल तर तुम्हाला 31,600 रुपये द्यावे लागतील.

दोन लोकांसाठी 25,730 रुपये शुल्क भरावे लागेल.

तसेच तीन लोकांसाठी 25,530 रुपये द्यावे लागतील.

* बुक कसे करावे

या टूर पॅकेजसाठी आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाउन बुक करू शकता. तसेच आयआरसीटीसी टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर, झोनल ऑफिस आणि रिजनल ऑफिसमधूनही बुकिंग करता येईल. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT