IRCTC Tour Package Dainik Gomantak
गोवा

IRCTC Goa Tour Package: डिसेंबरमध्ये गोव्यात यायचंय? IRCTC घेऊन आलीय परवडेबल टूर पॅकेज, पाहा डिटेल्स

भारत गौरव टुरिस्ट ट्रेनमधून हा प्रवास होणार आहे.

Pramod Yadav

IRCTC Goa Tour Package: गोवा भारतातील प्रसिद्ध पार्टी डेस्टिनेशन आहे. दरवर्षी लाखो पर्यटक गोव्याला भेट देतात. डिसेंबर महिन्यात गोव्यात मोठी गर्दी पाहायला मिळते, तुम्ही देखील वर्षाअखेरीस गोव्यात येण्याचा विचार करत असाल, तर IRCTC तुमच्यासाठी एक अप्रतिम आणि परवडणारे पॅकेज घेऊन आले आहे.

भारत गौरव टुरिस्ट ट्रेनमधून हा प्रवास होणार आहे. IRCTC ने ट्विट करून या टूर पॅकेजची माहिती दिली आहे. या दौऱ्याची सुरुवात तामिळनाडूतील तेनकासी येथून होणार आहे.

आयआरसीटीसीने ट्विट करून या पॅकेजची माहिती दिली आहे, या दौर्‍याची सुरुवात तामिळनाडूमधील तेनकासी येथून होणार आहे. ७ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणारा हा ५ रात्री आणि ६ दिवसांचा दौरा आहे.

पॅकेज 11,750 रुपये प्रति व्यक्ती पासून सुरू होईल. IRCTC वेबसाइट irctctourism.com ला भेट देऊन प्रवासी पॅकेजसाठी बुकिंग करू शकतात. एखदा पैसे दिल्यानंतर तुम्हाला प्रवासादरम्यान खाण्यापिण्याची आणि राहण्याची काळजी करण्याची गरज नाही.

पॅकेजचे नाव- गोवा स्पेशल (SZBG11A)

टूर किती दिवस चालेल - 5 रात्री आणि 6 दिवस निर्गमन

तारीख – 7 डिसेंबर 2023

जेवणाची सोय- सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण

प्रवाशाने निवडलेल्या श्रेणीनुसार, इकॉनॉमी श्रेणीतील प्रति व्यक्ती खर्च 11,750 रुपये मोजावे लागतील, तर 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलासाठी, 11,050 रुपये भाडे असेल. आराम श्रेणीसाठी प्रति व्यक्ती खर्च 19,950 रुपये मोजावे लागतील, तर 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलासाठी, 19,150 रुपये आकारले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT