IRCTC Goa Package
IRCTC Goa Package Dainik Gomantak
गोवा

IRCTC Goa Package: नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करा गोव्यात; IRCTC च्या खास पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल आणि बरंच काही...

Akshay Nirmale

IRCTC New Year Boananza in Goa: गोवा जगभरात तेथील समुद्रकिनारे, निसर्गसौंदर्य, हिरवळ यासाठी प्रसिद्ध आहे. हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. त्यामुळेच लोक सहसा सुट्टीसाठी गोव्याला जातात. नव वर्षाच्या सेलिब्रेशनसाठीही अनेकजण गोव्यात येत असतात.

आता इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने गोव्यात न्यू इअरसाठी खास पॅकेज आणले आहे. IRCTC ने 'न्यू इयर बोनान्झा इन गोवा' हे पॅकेज सर्वसामान्यांसाठी सुरू केले आहे.

कधी सुरू होणार?

'न्यू इयर बोनान्झा इन गोवा' (EGA013 B) ची ही सहल 22 जानेवारी 2022 पासून सुरू होईल. यामध्ये पर्यटक विमानाने गोव्याला जाणार आहेत. या पॅकेजमध्ये तुम्हाला इकॉनॉमी क्लासने गुवाहाटी ते गोवा हवाई तिकीट मिळेल. या टूर पॅकेजमध्ये तुमच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्थाही असेल.

पहिला दिवस

पर्यटकांना गुवाहाटी विमानतळावर पोहोचावे लागेल. त्यानंतर ते विमानाने गोवा विमानतळावर जातील. तेथून ते एका हॉटेलमध्ये रात्रीचे जेवण आणि विश्रांती घेतील.

दिवस 2

न्याहारीनंतर, पर्यटक उत्तर गोव्यात पर्यटनासाठी जातील. ते कळंगुट, बीच, बागा आणि आग्वाद किल्ल्याला भेट देतील.

दिवस 3

पर्यटक दक्षिण गोव्यात प्रेक्षणीय स्थळी जातील. ते मंगेशी मंदिर, ओल्ड गोवा चर्च, मिरामार बीच आणि दोना पावलालाही भेट देतील. त्यानंतर ते संध्याकाळी मांडवी नदीवर रिव्हर क्रूझचा आनंद घेतील.

दिवस 4

नाश्ता केल्यानंतर, पर्यटक दूधसागर धबधब्याला भेट देतील.

दिवस 5

सकाळी 00:50 वाजता परतीच्या फ्लाइटने गोव्यासाठी प्रयाण.

किती खर्च येईल

  • एका व्यक्तीसाठी - रु 47210

  • दोन व्यक्तींसाठी - रु 36690

  • तिघांसाठी - रु 36070

  • 5 ते 11 वर्षांच्या मुलांसाठी - रु 35150

  • 2 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी रु 34530

0-2 वर्षे वयोगटातील अर्भकाचे भाडे बुकिंगच्या वेळी ग्राहकाकडून IRCTC कार्यालयात रोख स्वरूपात जमा केले जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT