Lucknow Super Giants Team in Goa Dainik Gomantak
गोवा

LSG Team in Goa: लखनौ सुपर जायंट्स संघ गोव्यात दाखल; मॅच नाही तर 'हे' आहे कारण...

शापोरा येथील रिसॉर्टमध्ये या टीमचे वास्तव्य असणार आहे

गोमंतक ऑनलाईन टीम

Lucknow Super Giants Team in Goa: गोव्यामध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील लखनौ सुपर जायंट्स संघ सोमवारी गोव्यात दाखल झाला. खरे तर गोव्यात आयपीएलमधील एकही सामना खेळला जाणार नाहीय. पण तरीदेखील लखनौ संघ गोव्यात दाखल झाला आहे.

रविवारीच लखनौ संघाचा आयपीएलमधील सामन्यात पराभव झाला होता. गुजरात टायटन्स संघाने लखनौ सुपर जायंट्स संघावर 56 धावांनी विजय मिळवला होता. गुजरात टायटन्सचे मोठे 228 धावांचे मोठे आव्हान लखनौला पार करता आले नव्हते.

लखनौ संघाला 7 बाद 171धावसंख्या करता आली होती. या पराभवानंतर दुसऱ्याच दिवशी, सोमवारी लखनौ सुपर जायंट्सचा संघ गोव्यात दाखल झाला आहे.

एका जाहिरातीसाठी हा संघ गोव्यात आल्याचे समजते. ही जाहीरात शुट करून हा संघ पुढच्या मॅचसाठी रवाना होईल. लखनौ संघाचा पुढील सामना 13 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद संघाविरूद्ध होणार आहे. हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये हा सामना खेळला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT