IPL Cricket Betting Dainik Gomantak
गोवा

IPL Cricket Betting: पर्वरीत आयपीएल बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; तिघांच्या अटकेसह 2.10 लाखांचा मुद्देमाल जप्त

Porvorim IPL Betting Racket: आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्यांविरोधात गोवा पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत सट्टेबाजीचा आणखी एक प्रकार उघडकीस आणला आहे.

Sameer Amunekar

पर्वरी: आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्यांविरोधात गोवा पोलिसांनी गुरूवारी (१० एप्रिल)) मोठी कारवाई करत सट्टेबाजीचा आणखी एक प्रकार उघडकीस आणला आहे. पर्वरी पोलिसांनी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या तिघांना रंगेहाथ पकडलं.

पर्वरी पोलिसांना एका खासगी अपार्टमेंटमध्ये आयपीएल सामन्यावर सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल येथील तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि सट्टेबाजीसाठी वापरली जाणारं साहित्य जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी विजय कुमार मनवानी (वय ४५, रा. मध्य प्रदेश), मुसा शेख (वय २९, रा. पश्चिम बंगाल) आणि सुदेश कुमार ओटवानी (वय २५, रा. मध्य प्रदेश) या तिघांना अटक करण्यात आलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांनी सुकूर येथील एक व्हिला भाड्यानं घेतला होता आणि तेथून आयपीएल सामन्यांवर ऑनलाइन सट्टेबाजी सुरू होती.

मुद्देमाल जप्त

या छाप्यात पोलिसांनी ७ मोबाईल फोन्स, एक लॅपटॉप, आणि इतर इलेक्ट्रॉनिक अ‍ॅक्सेसरीज असा सुमारे २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर ऑनलाइन सट्टेबाजीसाठी केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. ही कारवाई गुरुवारी (१० एप्रिल) रात्री १०:५५ वाजता सुरू होऊन शुक्रवारी (११ एप्रिल) मध्यरात्री १२:३० वाजेपर्यंत चालली.

ऑनलाईन सट्टा लावणाऱ्यांचा पर्दाफाश

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर गोव्यात सट्टेबाजीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असून, या प्रकारावर अंकुश ठेवण्यासाठी गोवा पोलीस सट्टेबाज टोळ्यांवर लक्ष ठेवून कारवाई करत आहेत. राज्यात आयपीएल सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने सट्टा लावणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT