Court  Dainik Gomantak
गोवा

Suleman Khan Case: सुलेमानच्या पोलिस कोठडीसाठी SIT ची कोर्टात धाव; 31 जानेवारीला होणार अर्जावर सुनावणी

Suleman Khan Police Custody: संशयित सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याच्या पोलिस कोठडीसाठी विशेष तपास पथकाने (एसआयटी) म्हापसा न्यायालयात अर्ज केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: जमीन हडपप्रकरणीचा तपास सुरू असताना पोलिस कोठडीतून पलायन केलेल्या संशयित सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याच्या पोलिस कोठडीसाठी विशेष तपास पथकाने (एसआयटी) म्हापसा न्यायालयात अर्ज केला आहे. त्या अर्जावरील सुनावणी येत्या ३१ जानेवारीला न्यायालयाने ठेवली आहे. संशयित सुलेमान खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्याविरुद्ध अनेक जमीन हडप प्रकरणीचे गुन्हे एसआयटीकडे नोंद आहेत.

म्हापशातील जमीन हडपप्रकरणी संशयित सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याला अटक करून चौकशी सुरू असताना सुरक्षा पोलिस कॉन्स्टेबलला आमिष दाखवून कोठडीतून पलायन केले होते. याप्रकरणी जुने गोवे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता. सुलेमानला केरळमधून अटक करून गोव्यात (Goa) आणल्यावर जुने गोवे पोलिसांनी अटक केली होती. त्याची चौकशी पूर्ण झाल्यावर सात दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.

चौकशीसाठी हवा सुलेमानचा ताबा

संशयित सुलेमान खान याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर एसआयटीने त्याच्या पोलिस कोठडीसाठी अर्ज केला आहे. जमीन हडप प्रकरणाची चौकशी सुरू असताना संशयित सुलेमान पळाला होता. त्यामुळे ही चौकशी अर्धवट राहिली आहे. त्याला पुन्हा अटक झाल्यानंतर त्याला जुने गोवे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

आता तो न्यायालयीन कोठडीत असल्याने त्याची जमीन हडप प्रकरणाची पुढे चौकशी करायची आहे. त्याच्या इतर साथीदारांच्या जबान्या नोंदवून त्याची गुन्ह्यामधील भूमिका याचा शोध घ्यायचा आहे. त्यामुळे चौकशीसाठी पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे (Court) केली आहे. याप्रकरणातील त्याची पत्नी संशयित अफसाना ऊर्फ सारिका सुलेमान खान ही जामिनावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT