Merces Gas Leak Case Dainik Gomantak
गोवा

Merces: मेरशी गॅस गळती प्रकरण; क्लोरिन सिलिंडर आला कुठून? 15 दिवसांत उत्तर द्या

Merces Gas Leak Case: मेरशी पंचायतीने भंगार अड्डा १२ तासांच्या आत काम थांबवण्याचा आदेश दिला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

बामाणभाट, मेरशी येथे भंगार अड्ड्यात झालेल्या क्लोरिन गॅस गळती प्रकरणात मेरशीच्या ग्रामस्थांनी जुने गोवा पोलिस निरीक्षक यांना पत्र लिहून क्लोरीन सिलिंडर कुठून आला याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

तसेच भंगार अड्डा मालक नामदेव पचांगेच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची सूचना पत्रात केली आहे.

२७ रोजी पहाटे ५ वाजता सुमारात क्लोरीन गॅस गळती झाल्याने परिसरातील लोकांना त्रास झाला होता, त्यामुळे अनेकांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले होते.

१५ दिवसांत उत्तर द्यावे

मेरशी पंचायतीने भंगार अड्डा जमीनदोस्त करण्यासंदर्भात नामदेव पचांगेला कारणे दाखवा नोटीस बजावली असून उत्तर देण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. तसेच १२ तासांच्या आत काम थांबवण्याचा आदेश दिला आहे.

१ जुलै रोजी घेतलेल्या पंधरवड्या बैठकीत बेकायदेशीररीत्या भंगार अड्डा सुरू असल्याने हा जमीनदोस्त करण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आल्याचे नोटिसमध्ये उल्लेख केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: दुकानातला QR कोड काढला आणि स्वतःचा लावला, महिला कर्मचाऱ्याने गंडवले मालकालाच; 49 लाख पळवले

Goa Assembly Election 2027: 'पणजीतून अपक्ष उमेदवार म्हणूनच निवडणूक लढवणार'! उत्पल पर्रीकर यांनी केले जाहीर

'2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध, सुपर-8 मध्ये आफ्रिकेविरुद्ध भारत हारला तरी..', ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनने भारतीय संघाबाबत असे काही बोलला की..

VIDEO: गॅसतुटवडा प्रकरण पेटले, सिलिंडर पोचवणाऱ्या गाडीवर कुंकळ्ळीत हल्ला; दोघे गंभीर

IPL 2026: संजू सॅमसन घेणार 'धोनी'ची जागा? दिग्गज क्रिकेटपटूच्या वक्तव्यामुळे रंगली चर्चा; उपकर्णधारपदाचे वर्तवले भाकीत

SCROLL FOR NEXT