Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: पोलिसांच्या सापळ्यात अडकला ड्रग्ज विक्रेता! साडेसहा लाखांचे चरस हस्तगत; झारखंडच्या तरुणास अटक

Anjuna Crime: चिवार-हणजूण येथील फुटबॉल मैदान परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे साडेसहा लाख रुपयांचे चरस जप्त केले. याप्रकरणी संजय लिकीया दास (वय २६ वर्षे, मूळ झारखंड, सध्या रा. वागातोर) याला पोलिसांनी अटक केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime News

कळंगुट: चिवार-हणजूण येथील फुटबॉल मैदान परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे साडेसहा लाख रुपयांचे चरस जप्त केले. याप्रकरणी संजय लिकीया दास (वय २६ वर्षे, मूळ झारखंड, सध्या रा. वागातोर) याला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

शुक्रवारी रात्री चिवार-हणजूण येथील फुटबॉल मैदान परिसरात संजय दास हा तरुण ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक सूरज गावस आणि सहकाऱ्यांनी या परिसरात सापळा रचला. संशयित दास ठरल्यानुसार संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मैदान परिसरात येताच पोलिसांनी त्याला घेरले.

यावेळी कसून तपासणी केली असता, त्याच्याकडे सुमारे ६ लाख ५५ हजार रुपयांचे चरस आढळले. दास याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पर्यटन हंगाम सुरू झाला असल्याने पोलिसांनी किनारी भागावर बारीक नजर ठेवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT