ATM Robbery Dainik Gomantak
गोवा

Goa : मडगावातील एटीएम चोरी प्रकरणात आंतरराज्य टोळीचा हात?

तपासासाठी तीन पथके तैनात करण्यात आली असून अजून धागेदोरे मिळाले नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa ATM Theft Connection : रावणफोंड मिलिटरी कॅम्प जवळ असलेल्या आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यानी उखडून चोरून नेण्याच्या घटनेत. आंतरराज्य टोळीचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेत ७.३१ लाख रुपयांची चोरी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

चोरट्यांनी ATM मशीन फोडून आत असलेली रक्कम पळवली होती. चोरी करण्यासाठी फोडलेले रिकामे मशीन चोरट्यांनी दोन किमी अंतरावर असलेल्या नेसाय येथील रेल्वे पुलाजवळच्या झाडीत फेकून दिले होते. चोरीचे ATM मशीन वाहून नेण्यासाठी ज्या गाडीचा वापर करण्यात आला ती गाडीही चोरीची असल्याचे उघडकीस आले असून काम झाल्यावर चोरट्यांनी ही गाडी कोकण रेल्वे स्थानकाजवळ सोडून दिली. ही गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे.

या चोरीची एकंदर पद्धत पाहता या चोरीत आंतरराज्य टोळीचा हात असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. चोरीचा तपास करण्यासाठी एकूण तीन पथके तयार केली आहेत. मात्र अजून काही धागेदोरे हाती लागले नाहीत अशी माहिती मडगावचे पोलिस उपअधीक्षक शिवेंदू भूषण यांनी दिली.

हे एटीएम मशीन मुख्य रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या इमारतीत असून या रस्त्यावर गाड्यांची सतत ये जा चालू असते. असे असतानाही चोरट्यांनी मध्यरात्री रस्त्यावर होत असलेल्या शांततेचा फायदा उठवत सुरक्षा रक्षक तैनात न केलेले हे मशीन उखडून काढून नेले. या जागेपासून दोन किलोमीटरवर असलेल्या झाडीत नेऊन ते फोडले. त्यातील रोख रक्कम काढून घेऊन नंतर ते मशीन तिथेच टाकून दिले.

या चोरीसाठी अज्ञात चोरट्यांनी एका ओमनी व्हॅनचा वापर केला होता. ही गाडी दामोदर कारापूरकर यांच्या मालकीची असून त्यांनी ती कोकण रेल्वे स्थानक परिसराजवळ असलेल्या अग्निशमन दलाच्या कार्यालयाजवळ पार्क करून ठेवली होती. चोरट्यांनी ती चोरून आपला कार्यभाग उरकल्यावर कोकण रेल्वे स्थानकासमोर रस्त्यावर परत सोडून दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT