IFFI 2023 Goa Dainik Gomantak
गोवा

Iffi Goa 2023: इफ्फीत यावर्षी 270 हून अधिक चित्रपट, आंतरराष्ट्रीय विभागात चित्रपटांच्या संख्येत तिपटीने वाढ

महोत्सवात सुरुवातीला यूके थ्रिलर 'कॅचिंग डस्ट' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे

Pramod Yadav

Iffi Goa 2023: जगातील सर्वात मोठ्या चित्रपट आणि सांस्कृतिक महोत्सवांपैकी एक असलेला 54 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) 20 नोव्हेंबरपासून गोव्यात सुरू होणार आहे. या कार्यक्रमात 09 दिवसांच्या कालावधीत 270 हून अधिक चित्रपट दाखवले जाणार आहेत.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी राजधानी दिल्लीत पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली.

'भारतात निर्माण झालेले चित्रपट देशासह आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत. भारताचा मीडिया आणि मनोरंजन उद्योग जागतिक स्तरावरील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून गणली जाईल एवढी त्याची शक्ती आहे. गेल्या तीन वर्षांत सरासरी वार्षिक 20 टक्के वाढ होत आहे, असे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.

महोत्सवात सुरुवातीला यूके थ्रिलर 'कॅचिंग डस्ट' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे तर, 2023 च्या यूएस बायोग्राफिकल स्पोर्ट्स ड्रामा 'द फेदरवेट' सह महोत्सव समाप्त होईल.

'प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते आणि निर्माते मायकल डग्लस यांना प्रतिष्ठित सत्यजित रे एक्सलन्स इन फिल्म लाइफटाइम पुरस्काराने सन्मानित केले जाईल.' डग्लस आपली पत्नी आणि अभिनेत्री कॅथरीन झेटा जोन्ससह प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारण्यासाठी वैयक्तिकरित्या हजर राहणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी दिली.

इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय विभागात चित्रपटांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली आहे. महोत्सवादरम्यान चार ठिकाणी 270 हून अधिक चित्रपट दाखवले जाणार आहेत.

आंतरराष्ट्रीय विभागात 198 चित्रपट प्रदर्शित केले जातील, 53 व्या महोत्सवापेक्षा 18 अधिक आहे. यावर्षी 13 जागतिक प्रीमियर, 18 आंतरराष्ट्रीय प्रीमियर, 62 आशिया प्रीमियर आणि 89 भारतीय प्रीमियर होणार आहेत.

या वर्षी IFFI ला 105 देशांमधून 2,926 एवढी विक्रमी नोंदणी प्राप्त झाली आबे, गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट आंतरराष्ट्रीय सबमिशन मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT