Goa BJP | Sadanand Tanavade  Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: प्रदेशाध्यक्षपद निवडीचा 'गुंता' कसा सोडवणार? 'भाजप' नेत्यांमध्ये चढाओढ

Goa Politics: भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण याचीच उत्सुकता खुद्द भाजपमध्ये आहे. यापूर्वी भावी प्रदेशाध्यक्ष कोण याचे उत्तर मिळत असे, आता तशी स्थिती नसल्याने या पदासाठी कोण दावेदार असेल याचीच चर्चा सत्ताधारी वर्तुळात सुरू झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण याचीच उत्सुकता खुद्द भाजपमध्ये आहे. यापूर्वी भावी प्रदेशाध्यक्ष कोण याचे उत्तर मिळत असे, आता तशी स्थिती नसल्याने या पदासाठी कोण दावेदार असेल याचीच चर्चा सत्ताधारी वर्तुळात सुरू झाली आहे.

मावळते प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दोनवेळा प्रदेशाध्यक्षपद भूषवले असल्याने यावेळी बदल अटळ आहे. त्यांच्या शिफारशीवरून राष्ट्रीय निवडणूक अधिकारी डॉ. के. लक्ष्मण यांनी माजी जिल्हा पंचायत सदस्य आणि माध्यम विभागाचे प्रभारी प्रेमानंद म्हांबरे यांची भाजपचे राज्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सह निवडणूक अधिकारी म्हणून केशव प्रभू व शर्मद पै रायतूरकर काम पाहणार आहेत.

मंडळ पातळीवरील समित्यांची निवड आधी केली जाणार आहे. त्यानंतर जिल्हा समित्या स्थापन केल्या जातील. त्यातून राज्य समिती निवडली जाईल. नंतर प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार आहे. भाजपच्या प्रथेनुसार राज्यातील निवडी या बिनविरोध होतात.

गरज भासलीच तर यासाठी सक्रिय सदस्यांनाच मतदान करता येते. पुढील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार आहे. सध्याचे प्रदेश सरचिटणीस दामूू नाईक आणि सचिव दयानंद सोपटे यांची नावे या पदासाठी घेतली जात आहेत. हे दोघेही भंडारी समाजातील आहेत. मांद्रेतील राजकीय गुंता सोडवण्यासाठी सोपटे यांच्याकडे संघटनात्मक जबाबदारी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे.

सदस्य नोंदणीनंतर निवड प्रक्रिया

सदस्यत्व नोंदणीनंतर सक्रिय सदस्य निश्चित केले जाणार आहेत. त्यातून मंडळ, जिल्हा, राज्य पातळीवरील पदाधिकारी निवडले जाणार आहेत. त्यातूनच राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी राज्याचे प्रतिनिधी पाठवले जातील. या प्रक्रियेतच प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fianance Scam: गोव्यात आजवरचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा; गुंतवणुकीच्या नावाखाली 50 जणांना 130 कोटींचा गंडा

Mayem Fire Incident: वायंगिणी-मयेत आगीचा तांडव! 30 लाख रुपयांचे नुकसान; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

Cash For Job: आमच्यावर पोलिसांमार्फत पाळत! सरदेसाई, पालेकरांचा सनसनाटी आरोप

Rashi Bhavishya 25 November 2024: उद्योजकांसाठी आजचा दिवस खास, मिळणार मोठी डील... तुमच्या राशीत दडलंय काय?

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

SCROLL FOR NEXT