Instagram Viral Video On Goa Dainik Gomantak
गोवा

Viral Video: 'त्या' व्हिडिओवरून तरूणी म्हणाली, 'माझा तसा उद्देश नव्हता'; हात जोडून मागितली गोव्याची माफी

गोवा म्हणजे दारू, बिकिनी असे चित्र रंगवणाऱ्या सोशल मिडियावरील एका कथित इन्फ्लुएंसर तरूणीचा व्हिडिओ गोव्यात सर्वत्र चांगलाचा व्हायरल झाला.

Pramod Yadav

गोवा म्हणजे दारू, बिकिनी असे चित्र रंगवणाऱ्या सोशल मिडियावरील एका कथित इन्फ्लुएंसर तरूणीचा व्हिडिओ गोव्यात सर्वत्र चांगलाचा व्हायरल झाला. त्यानंतर या व्हिडिओबाबत सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या. विधानसभेत देखील अशापद्धतीने गोव्याची बदनामी करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी वास्कोचे आमदार कृष्णा दाजी साळकर यांनी केली.

दरम्यान, व्हिडिओवरून सर्वत्र पडसाद उमटल्यानंतर अखेर या तरूणींनी माझा गोव्याची बदनामी करण्याचा उद्देश नव्हता असे म्हणत होत जोडून गोवा आणि गोंयकारांची माफी मागितली आहे.

झाले असे की मोनालिसा घोष या तरूणीने इन्स्टाग्राम अकाउंटवरून गोव्याबाबत एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत गोव्यातील झोमॅटोवर फक्त दारूच मिळते, चहा पिल्यावर दंड आकारला जातो आणि कपडे खरेदीला गेल्यावर फक्त बिकिनी मिळते अशा आशयाचा  व्हिडिओ  तरूणीने तिच्या 'थॉटफूल गर्ल' या अकाउंटवरून शेअर केला होता.

दरम्यान, या व्हिडिओवरून मोनालिसा घोषने माफी मागितली आहे. "मी अलिकडे गोव्यात गेले होते, त्यावेळी मी येथील बीच, चर्च याठीकणी काही कॉमेडी व्हिडिओ बनवले होते. या व्हिडिओत काही अक्षेपार्ह शब्द होते याची मला आत्ता जाणीव होत आहे. पण, माझा गोव्याची बदनामी करण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. पण, माझ्या या व्हिडिओमुळे गोवा आणि गोंयकरांच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून माफी मागते असे या तरूणीने म्हटले आहे."

Instagram Reels मधून गोव्याची बदनामी केल्यास होणार कारवाई

सोशल मिडियाच्या माध्यमातून गोव्याची बदनामी केल्यास आता त्या व्यक्तीविरोधात कारवाई केली जाईल. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज पावसाळी अधिवेशानाच्या अकराव्या दिवशी सभागृहात दिली.

वास्कोचे आमदार कृष्णा दाजी साळकर यांनी शून्य कालमध्ये याबाबत प्रश्न विचारला, त्यावर मुख्यमंत्री सावंत यांनी उत्तर दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT