Goa GIDC Dainik Gomantak
गोवा

Goa GIDC: प्रदूषणाच्या अंगाने उद्योगांची तपासणी सुरू

Goa GIDC: डॉ. पाटील : कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील चित्र महिन्याभरात होईल स्पष्ट

दैनिक गोमन्तक

Goa GIDC: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत नेमके किती प्रदूषण झाले आहे, याचे चित्र महिन्याभराने स्पष्ट होणार आहे. या औद्योगिक वसाहतीतील उद्योगांची प्रदूषणाच्या अंगाने तपासणी करणे गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुरू केले आहे. आतापर्यंत 80 टक्के उद्योगांची तपासणी पूर्ण झाली आहे, असे मंडळाचे अध्यक्ष डॉ. महेश पाटील यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.

या पाहणीत काही उद्योगांनी प्रदूषणाची पातळी ओलांडल्याचे दिसून आले आहे. ज्या उद्योगांनी किरकोळपणे पातळी ओलांडली आहे त्यांना येत्या दोन महिन्यांत योग्य ती उपाययोजना करण्याची सूचना करण्यात आली आहे.

काहींनी दखलपात्र पद्धतीने पातळी ओलांडली आहे, त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावणे सध्या सुरू केले आहे. ते काम तेथील तपासणी पूर्ण होईपर्यंत सुरूच राहणार आहे. त्यांनाही प्रदूषणमुक्तीसाठी उपाययोजना करण्यासाठी ठरावीक कालावधीची मुदत दिली जाणार आहे.

त्यात त्यांनी तसे केले नाही तर त्यांना पुढील कारवाईस सामोरे जावे लागेल, ज्यात उद्योग बंद करण्याच्या आदेशाचाही समावेश असू शकतो, असे पाटील म्हणाले.

या औद्योगिक वसाहतीत यापूर्वी प्रदूषण झाल्याचा इतिहास आहे. त्याविषयी मंडळाकडे तक्रारी आल्यानंतर आता सर्वच उद्योगांची तपासणी हाती घेतली आहे. तेथील भूजलाचे नमुनेही तपासणे मंडळाने सुरू केले आहे.

प्रदूषणाची कारणे शोधून ती दुरुस्त करण्यावर भर असेल. यामुळे जरा बारकाईनेच तपास आरंभला आहे. मंडळाचे पथक कुंकळ्ळीत जाऊन आवश्यक ते नमुने तपासणीसाठी आणत आहे. गेले आठवडाभर हे काम सुरू होते आणि आणखीन आठवडाभर हे काम सुरू राहील. - डॉ. महेश पाटील, अध्यक्ष, राज्य प्रदूषण मंडळ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पोर्तुगीजकालीन कागदपत्रे आता एका क्लिकवर! 'गोवा ऑनलाईन' पोर्टलवर सुरु होणार सर्वात मोठी डिजिटल सेवा; नागरिकांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार

खरी कुजबुज: युती तुटणार? की वाद मिटणार?

Maina Curtorim Mega Project Protest: सरपंच, सचिवावर कारवाई करा! मायणा-कुडतरी मेगा गृहप्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Goa Mega Project Protest: गावाचे गावपण नष्ट करु नका! दवंडे प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा मडगाव पालिकेवर मोर्चा; 15 दिवसांत प्रकल्प रद्द करण्याचे निवेदन

CM Janjatiya Maje Ghar Yojana: आदिवासी बांधवांसाठी खूशखबर! ‘मुख्यमंत्री जनजातीय माझे घर’ योजना सुरु; आता तुमचे घर होणार हक्काचे आणि कायदेशीर

SCROLL FOR NEXT