Goa Medical College Food Stalls | Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

GMC बाहेरील खाद्यपदार्थ स्टॉल्सची तपासणी; अन्न सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्यांचे परवाने होणार निलंबित

आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा इशारा

Kavya Powar

Goa Medical College Food Stalls : सध्या राज्यात अन्न सुरक्षेचा मुद्दा चर्चेचा मुद्दा बनला आहे. यातच गोव्याची जीवनदायिनी असलेल्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयाबाहेरील फूड स्टॉल्सचीही तपासणी करण्यात आली. मोठ्या प्रमाणात नागरिक आरोग्य तपासणीसाठी GMC मध्ये येत असतात.

अशावेळी बहुतांश लोक हे बाहेर असलेल्या फूड स्टॉल्सवरच उपलब्ध असलेल्या गोष्टी खातात. यामध्ये स्वच्छता आणि अन्न सुरक्षा मानके राखली जातात का? याची खात्री करण्यासाठी FDA ने GMC च्या परिसरातील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सची तपासणी केली.

याबाबत आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले की, FDA संचालकांना स्वच्छतेच्या मुद्द्यांवर अत्यंत कडक राहण्याचे निर्देश दिले आहेत, मग ते रेस्टॉरंट असोत, खाद्यपदार्थांच्या गाड्या असोत किंवा स्वयं-सहायता गट असोत.

अन्नपदार्थांच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. जे अस्वच्छ परिस्थितीत काम करतात, अन्न तयार करतात आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन करत नाहीत त्यांचे परवाने निलंबित केले जातील, असा इशारा आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT