Goa Development  Dainik Gomantak
गोवा

Goa Development : कुडचडे मतदारसंघातील चालू विकासकामे लवकरच पूर्ण करू

नीलेश काब्राल : काडा हॉल, होडर येथील पुलाच्या कामांची पाहणी

गोमन्तक डिजिटल टीम

केपे : कुडचडे मतदारसंघात अनेक विकासकामे सुरू असून त्यामुळे कुडचडेतील लोकांना बरेच त्रास होत आहेत याची पूर्ण जाणीव मला आहे. ही कामे येत्या काही महिन्यांत पूर्ण होणार असून लोकांनी तोपर्यंत थोडी कळ सोसावी,

असे आवाहन कुडचडेचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी केले. आज (सोमवारी) त्यांनी कुडचडे येथील काडा हॉल, अग्निशामक दलाची इमारत तसेच होडर येथील पुलाच्या कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

कुडचडे येथील होडर पुलाचे बांधकाम सुरू असून त्यासाठी हे पूल सात दिवसांसाठी वाहतुकीसाठी बंद ठेवल्याने काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला होता. कोणतेही काम करताना सुरवातीला त्रास होतो; पण नंतर चांगले फळ मिळते, असे यावेळी काब्राल यांनी सांगितले.

हा पूल चारपदरी होणार असून त्यासाठी पाहिल्या टप्प्यात दोन लोखंडी गडर तयार केले आहेत. १ रोजीपासून गडर घालण्याचे काम सुरू झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर जुना पूल पाडून त्याजागी नवीन असेच लोखंडी गडर घालून अत्याधुनिक पद्धतीने तयार केलेला चारपदरी पूल पूर्णत्वास येणार असल्याचे काब्राल यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात एक कोटीचा खर्च

कुडचडे येथील काडा हॉलचे सुशोभीकरण युद्धपातळीवर सुरू असून सुमारे एक कोटी पहिल्या टप्प्याच्या कामावर खर्च करण्यात येणार आहेत. पूर्वी हा हॉल जलस्रोत खात्याच्या ताब्यात होता. नंतर याचा ताबा कुडचडे पालिकेकडे देण्यात आल्यानंतर पालिकेने या हॉलच्या सुशोभीकरणास सुरुवात केली होती. या हॉलची जबाबदारी निविदा काढून सर्वाधिक बोली लावणाऱ्याकडे सोपविली जाणार असल्याचे काब्राल यांनी सांगितले.

कुडचडे येथील अग्निशामक दलाच्या इमारतीचे सुशोभीकरण हाती घेतले असून साधारण ५८ लाख यावर खर्च करण्यात येणार आहेत. या इमारतीला नऊ वर्षे पूर्ण झाली असून पावसामुळे आतील भागात काही ठिकाणी इमारतीच्या भिंतींना तडे गेले असल्याने या इमारतीचे काम हाती घेतले आहे. इमारतीच्या छपराचे काम तसेच अग्निशामक दलाच्या जवानांना आराम करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील.

- नीलेश काब्राल, सार्वजनिक बांधकाम मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

VIDEO: हवेतच विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये घुसले रबराचे तुकडे अन्..., इराणमध्ये बोइंग 737 चं थरारक इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT