Goa mini bus accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: बेदरकार मिनी बसचालकाने दुचाकीला उडवले! दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू; आके-पॉवरहाऊस मार्गावर भीषण अपघात

Margao Road Accident Latest News: एका मिनी बसचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीला धडक दिली होती.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: एका मिनी बसचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीला धडक दिली होती. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेले सुरेश गावडे यांचा गोमेकॉत उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेड कॉन्स्टेबल प्रसन्न प्रभुगावकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना ४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५.५५ वाजण्याच्या सुमारास आके येथील टी. बी. कुन्हा शाळेजवळ घडली. बसचालक हमीद महमूद मामलेकर (रा. आर्लेम) हा बस घेऊन आके येथून पॉवरहाऊस जंक्शनच्या दिशेने जात होता.

बस टी.बी. कुन्हा शाळेजवळ पोहोचली असता, चालकाने वाहन अत्यंत बेदरकारपणे चालवून होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कूटरला पाठीमागून धडक दिली. यावेळी स्कूटरस्वार सुरेश गावडे (रा. दवर्ली, मडगाव) हे रस्त्यावर कोसळले. त्यांना गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर हमीदने घटनास्थळावरून पळ काढला. गावडे यांना दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना गोमेकॉत हलविले. उपचारावेळी गावडे यांचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT