Goshala Dainik Gomantak
गोवा

वाळपईच्या 'गोशाळेत' जखमी वासराला जीवदान

भटकी गुरे रस्त्यावर पडलेले विविध प्रकारचे प्लास्टिक खातात.

दैनिक गोमन्तक

वाळपई: नाणूस येथील अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रघुनाथ धुरी, वैद्यकीय सहकारी गोसेवक, पदाधिकारी यांच्या सहकार्याने असंख्य भटक्या गुरांवर आजपर्यंत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. पंधरा दिवसांपूर्वी एका अपघातग्रस्त वासरावर उपचार करण्यात आले. सहकारी गोसेवकांच्या मदतीने डॉ. रघुनाथ धुरी यांनी शस्त्रक्रिया करून वासराला जीवदान दिले.

भटकी गुरे रस्त्यावर पडलेले विविध प्रकारचे प्लास्टिक खातात. परिणामी हळूहळू पोटात प्लास्टिक पदार्थांचा मोठा थरच तयार होतो. हे भयानक चित्र आहे. त्यातून गुरांचा मृत्यूही होतो. वाळपई भागात असंख्य भटकी गुरे आहेत. त्यात गाय, बैल, पाडा, वासरू यांचाही समावेश असतो.गेली चौदा वर्षे रस्त्यावर अपघातग्रस्त झालेल्या गुरांना गोशाळेत आणून तिथे योग्य तो उपचार केले जातात. गोशाळेचे डॉ. रघुनाथ धुरी व अन्य सहकारी डॉक्टर, सेवक वर्ग भटक्या अपघातग्रस्त गुरांची सेवा बजावित आहेत.

गोमूत्राद्वारे औषधनिर्मिती

केंद्रात आरोग्यवर्धक सेंद्रीय पध्दतीने औषधी उत्पादने तयार केली जातात. 2008 सालापासून गेली चौदा वर्षे ही गोशाळा गायी-गुरांच्या रक्षणासाठी झटत आहे. देशी गाय मानवासाठी कशी उपयोगी आहे, हे पटवून देण्यासाठी औषधांची निर्मिती केली जात आहे. व ही बनविलेली औषधे विक्रीसाठी माफक दरात उपलब्ध केली जातात. गोमूत्र अर्क जो बलवर्धक, रोगप्रतिकारक, अनेक रोगांवर गुणकारी आहे. तुलसी अर्क कफ, खोकला, सर्दी, दमा, सायनस, मलेरिया, कृमीनाशक आहे. मेदोहर अर्क चरबी, लठ्ठपणा कमी होण्यास उपयुक्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjai Temple Case: मोरजाई देवस्थानच्या मालमत्तेत अपहाराचा आरोप! माजी अध्यक्षासह दोघांना अटक; मांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Indonesia Passenger Ship: इंडोनेशियात 240 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बेपत्ता; वादळी हवामानामुळे संपर्क तुटल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

Goa Politics: भाजपला तिसऱ्या आघाडीची भीती नाही! दामू नाईकांचा विरोधकांना टोला; '2027 मध्ये पुन्हा भाजपच सत्तेत येणार'

Goa Congress: काँग्रेसची 'गोवा राखण यात्रा' 22 सप्टेंबरपासून! 27 दिवसांत सर्व 40 मतदारसंघांचा दौरा; जमीन, पर्यावरण आणि अस्मितेसाठी लढ्याची घोषणा

Guru Mangal Yuti 2026: 18 सप्टेंबरला महाचमत्कार! गुरु-सेनापती युतीनं चमकणार 4 राशींचं नशीब; हाती लागणार कुबेराचा खजिना

SCROLL FOR NEXT