Karmali lakes  Dainik Gomantak
गोवा

करमळी तळे सुशोभिकरणासाठी पुढाकार!

जलस्रोतमंत्र्यांकडून पाहणी: पर्यावरण परवान्यानंतर काम सुरू

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील सर्वात मोठे तळे असलेल्या करमळी तळ्याच्या सुशोभिकरणासंदर्भात जलस्रोत खात्याकडून पुढाकार घेण्यात आला आहे. या तळ्यातील गाळ उपसा करण्यासाठी पर्यावरण मंडळाची परवानगी पाहिजे. ही परवानगी मिळाल्यास या तळ्यातील गाळ उपसण्याबरोबरच पाण्यातील तण काढण्याचे काम हाती घेण्याचे खात्याने ठरविले आहे.

जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांच्याबरोबर करमळी तळ्याची पाहणी केली. या पाहणीनंतर बोलताना मंत्री शिरोडकर म्हणाले की, या तळ्याची देखभाल करण्याचा अधिकार वन खात्याकडे आहे. या तळ्यातील गाळ उपसा करण्याचे काम जलस्रोत खात्याकडून केले जाईल.

मात्र, त्यासाठी पर्यावरण खात्याकडून परवाना हवा आहे. त्यासाठीचा प्रस्ताव या खात्याकडे पाठवण्यात येणार आहे. परवानगी मिळाल्यास या तळ्याचे काम सुरू केले जाईल. जलस्रोत खात्याला या तळ्याचा विकास करून त्याचे सुशोभिकरण करून पर्यटन स्थळ करण्याचा विचार आहे.

या तळ्याच्या सुशोभिकरणा संदर्भातचा निर्णय अनेक वर्षापूर्वी घेण्यात आला होता. या तळ्याचे सौंदर्य व येणाऱ्या विदेशी पक्षांमुळे पर्यटन स्थळ होऊ शकते त्यासाठी स्थानिक आमदारांनी प्रयत्न केले होते. मात्र, ते पूर्ण झालेच नाही. या पक्षांना पाहण्यासाठी अनेक विदेशी पर्यटक करमळी तळ्याला भेट देतात. या तळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आहे तो उपसणे गरजेचे आहे, असेही शिरोडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajay Kholkar Disciplinary Action: आरजीपीला मोठा धक्का! वरिष्ठ पदाधिकारी तथा खजिनदार अजय खोलकर यांची पक्षातून हकालपट्टी

Canacona Construction Workers: काणकोणात मजुरांच्या मनमानी मजुरीला लगाम! गवंड्यांसाठी 1200 रुपये किमान वेतन निश्चित

Navpancham Rajyog 2026: 16 सप्टेंबरला आकाशात घडणार मोठा चमत्कार! गुरु-चंद्राचा दुर्मिळ 'नवपंचम राजयोग'; 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस

Five State Assembly Elections: 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा वेध! 'जेन-झी' मतदार ठरणार गेमचेंजर; मोदी सरकारसमोर तरुणांना आकर्षित करण्याचे मोठे आव्हान

VIDEO: 'ट्रॉफी चोर, ट्रॉफी चोर'! टीम इंडियाच्या विजयानंतर मोहसिन नक्वीची फजिती; भारतीय चाहत्यांच्या घोषणाबाजीचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT