Goa Rain Update Dainik Gomantak
गोवा

यंदा सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडणार; हवामान खात्याने दिली माहिती

यंदाचा नैऋत्य मोसमी पावसाचा IMD ने अंदाज वर्तवला असुन संपूर्ण देशात नैऋत्य मोसमी पावसाचा (जून ते सप्टेंबर) पाऊस सामान्य असण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: यंदाचा नैऋत्य मोसमी पावसाचा IMD ने अंदाज वर्तवला असुन संपूर्ण देशात नैऋत्य मोसमी पावसाचा (जून ते सप्टेंबर) पाऊस सामान्य असण्याची शक्यता आहे. यंदा सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. (Information provided by the IMD This year will receive 99 percent of the average rainfall)

विदर्भ ते कर्नाटकापर्यंत वाऱ्याचा वेग तसेच दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात वार्‍याची उपस्थिती असल्याने, गोव्यात (Goa) 2 दिवस सामान्यतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यात 14 आणि 15 एप्रिलपर्यंत पाऊस/गडगडाटी पावसाची (Rain Update) शक्यता कायम राहील.

14 एप्रिल रोजी दोन्ही जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी ताशी 40-50 किमी वेगाने वाहणाऱ्या विजांचा आणि वाऱ्याचा इशारा जारी करण्यात आला आहे. तसेच येत्या 4-5 दिवसात तापमानात कोणतीही लक्षणीय वाढ होण्याची शक्यता नाही.

15 एप्रिलपर्यंत तापमानात 2 अंश सेल्सिअस तापमानाची होणार वाढ

अरबी समुद्रात केरळजवळ निर्माण झालेल्या हवामान बदलामुळे 15 एप्रिलपर्यंत तापमानात 2 अंश सेल्सिअस तापमानाची वाढ होणार असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याबरोबर मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वेधशाळेने (IMD) व्यक्त केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण असले तरी त्यामध्ये झालेली वाढ यामुळे आणि काही उपखंडांमधील वातावरणातील बदलामुळे राज्यातील तापमानात वाढ होणार असून ते 2 अंश सेल्सिअसपर्यंत वाढणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cooperative Societies: राज्यातील 42% सहकारी सोसायट्या बंद, 42% सोसायट्या तोट्यात; सहकार क्षेत्राच्या आर्थिक सक्षमतेवर केंद्रीय सहकारमंत्र्यांकडून प्रश्नचिन्ह

Goa Fisheries Projects Pending: गोव्याच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राला निधीचा फटका! 53 कोटी मिळाले; पण 6 वर्षांत अवघे 47 कोटीखर्च, केंद्रीयमंत्र्यांचा संसदेत खुलासा

National Education Policy Goa: पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 10 वी अन् 11वीतही 'NEP' लागू होणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Goa Assembly Three Day Session: सहा महिन्यांचा हिशेब ३ दिवसांत! विरोधी पक्षनेत्यांची टीका, 31ऑगस्‍ट ते 2 सप्‍टेंबर अल्प कालावधीचे अधिवेशन

Student Protest Firing Allegations: 'गृहमंत्र्यांनीच दिला आंदोलकांवर गोळीबाराचा आदेश!' लोकसभेत परीक्षा दुरुस्ती विधेयक मंजूर, विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपाने संसदेत गदारोळ

SCROLL FOR NEXT