उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची माहिती जनमानसात पोहचविणे गरजेचे

पोर्ट्रेट आपण स्वातंत्र्य लढ्यावरील (freedom fight) अनेक पुस्तकांचे संंदर्भ घेऊन केले असे चित्रकार नगर्सेकर यानी सांगितले.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: स्वातंत्र्याची 60 वर्षे पुर्ण केल्याचे औचित्य साधुन गोव्यात सरकार(Government) विविध उपक्रम राबवित आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास व स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान व कार्य जानमानसात खास करुन तरुण पिढीपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे व त्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यानी सांगितले.

रवीन्द्र भवन (Rabindra Bhavan) मडगावमध्ये माहिती व प्रसिद्धी खात्या तर्फे चित्रकार वसंत सुरेश नगर्सेकर यानी रंगवलेल्या 60 स्वातंत्र्यसैनिकांच्या पोर्ट्रेट प्रदर्शनाचे (portrait display) उदघाटन केल्यावर ते प्रसार माध्यमाशी बोलत होते. या प्रसंगी रवीन्द्र भवन मडगावचे अध्यक्ष दामोदर (दामू) नाईक), भवनच्या सदस्य सचिव संध्या कामत, माहिती व प्रसिद्धी खात्याचे अधिकारी श्याम गावकर व चित्रकार वसंत नगर्सेकर उपस्थित होते.

गोव्याच्या स्वातंत्र्याची 60 वर्षे पुर्ण करणाऱ्या या वर्षात सरकारने जे कार्यक्रम आंखले आहेत त्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सर्व थरातील लोकांना सामील करुन घेत आहेत असेही त्यानी सांगितले.

गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात मडगावहुन झाली. ही गोव्याची पुण्यभुमी आहे. स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास प्रेरणा देणारा आहे व त्यातुन पुढे जाणे महत्वाचे आहे. हा ठेवा जतन करुन ठेवणे, त्यातुन जगण्याचा नवा आयाम मिळावा. सरकारचे उपक्रम तळागळात पोहोचावे व खास करुन शालेय विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन आवर्जुन पहावे असे आवाहन दामू नाईक यानी केले.

आपल्याला हे पोर्ट्रेट तयार करण्यास चार महिने लागले. हे पोर्ट्रेट आपण स्वातंत्र्य लढ्यावरील अनेक पुस्तकांचे संंदर्भ घेऊन केले असे चित्रकार नगर्सेकर यानी सांगितले. हे प्रदर्शन 30 नोव्हेेंबर पर्यंत लोकांसाठी खुले असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT