Goa Assembly Session | Mauvin Godinho  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: गोव्यात येणाऱ्या उद्योगांना स्थानिकांना रोजगार द्यावे लागतील; उद्योगमंत्री माविन गुदिन्हो

खोर्ली औद्योगिक वसाहतीतील एकूण 107 पैकी 21 युनिट बंद अवस्थेत

Akshay Nirmale

Goa Assembly Session 2023: गोव्यात येणाऱ्या उद्योगधंद्यांना गोव्यातील स्थानिकांना रोजगार देण्यासाठी दबाव टाकला जाईल अशी माहिती, उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.

खोर्ली येथील औद्योगिक वसाहतीत विकासाची अनेक कामे सुरू आहेत. सध्या खोर्ली औद्योगिक वसाहतीत एकूण 107 पैकी 86 युनिट सुरू आहेत तर 21 बंद अवस्थेत आहेत, अशी माहितीही मंत्री गुदिन्हो यांनी दिली.

बंद पडलेल्या उद्योगांना पुन्हा सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. केंद्राच्या गतीशक्ती योजनेचीही मदत त्यासाठी घेतली जाणार आहे, असेही गुदिन्हो यांनी सांगितले. औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमणांचेही सर्व्हेक्षण केले जात आहे. येत्या काही काळात ती सर्व माहिती उपलब्ध केली जाईल.

स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी डिफेन्स एक्सपो साईट किटाळ येथे चांगला प्रकल्प उभारण्याची विनंती केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी केली. त्यावर उद्योगमत्री माविन गुदिन्हो यांनी आपल्याला प्रदूषण न करणारे उद्योग हवे आहेत, असे सांगत आमदारांनी याबाबत सूचना द्याव्यात, अशी माहिती दिली.

दरम्यान, कुंकळी औद्योगिक वसाहतीतील अनियमितता, प्रदूषण आणि अतिक्रमणाचा मुद्दा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pond Fish Death Goa: गणपती विसर्जनानंतर कपिलेश्वरी-कवळेच्या तळीत मासे मृत; 'बॉम्बसदृश' फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्याचा स्थानिकांचा दावा

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

Sudan Gold Mine Accident: 7 दिवसांत दुसऱ्यांदा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! सुदानमध्ये सोन्याची खाण खचून 11 मजुरांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT