India post Recruitment  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात सरकारी नोकरीची संधी; पोस्टात 39 पदांसाठी अर्ज मागवले

डाकसेवक पदासह अन्य जागांवर भरती; 5 जूनपर्यंत अर्जासाठी मुदत

दैनिक गोमन्तक

पणजी : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या गोमंतकीयांसाठी खुशखबर आहे. गोव्यात टपाल खात्याने नोकरीची संधी उपलब्ध केली आहे. गोव्यात विविध गावांमध्ये पोस्टामध्ये भरती होणार असून त्यासाठी अर्जही मागवण्यात आले आहेत. येत्या 5 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे.

गोव्यासाठी पोस्ट खात्याने 39 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जांसाठी http://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावरील पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन पोस्ट खात्याकडून करण्यात आलं आहे. 5 जून 2022 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. यानंतर अर्जांची छानणी करुन पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.

गोव्यात बेरोजगारीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. निवडणुकीतही सर्वच पक्षांनी बेरोजगारी मिटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन मतदारांना दिलं होतं. त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या गोमंतकीय तरुणांसाठी ही एक चांगली संधी मानली जात आहेत. पोस्टाने डाक सेवक पदासाठी अर्ज मागवलेल्या गावांमध्ये आवेडे, बांबोळी, बांदोडा, बस्तोडा, कामुर्ली, कासावली, कारोना, चिखली, चिंबल, कोरगाव, खोर्जुवे, कुंभारजुवा, कुंडई, धारबांदोडा, फातोर्पा, गुळेली, इब्रामपूर, केरी, मांद्रे, म्हावळिंगे, मुळगाव, नानोडा, नावेली, ओर्ले, पाळोळे, पेन्हा दी फ्रान्का, पियादाद, पीर्ण, पर्वरी, किरणपाणी, रेईस मागूश, साळगाव, साल्वादोर द मूंद, उसगाव, झुवारीनगर येथे पोस्ट खात्याकडून डाक सेवकांची नियुक्ती केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT