Indian Panorama Dainik Gomantak
गोवा

Indian Panorama: ‘इंडियन पॅनोरोमा’ हा भारतीय चित्रपटसृष्टीचा आरसाच !

Indian Panorama: दिग्दर्शक टी.एस. नागभरण : 25 चित्रपट निवडणे कठीण काम होते

दैनिक गोमन्तक

Indian Panorama: इंडियन पॅनोरोमात मोठ्या प्रमाणात चित्रपट आले होते, त्यात 25 चित्रपट निवडणे हे अतिशय कठीण काम होते. जे सर्वोत्तम चित्रपट आहेत अशाच चित्रपटांना या विभागात निवडले असून इंडियन पॅनोरोमा हा भारतीय सिनेसृष्टीचा आरसा असल्याचे प्रतिपादन ज्यूरी प्रमुख कन्नड चित्रपट दिग्दर्शक टी.एस. नागभरण यांनी सांगितले.

गोवा मनोरंजन सोसायटी आवारात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ज्युरी सदस्य प्रदीप कुरबा, कमलेश मुखर्जी, अंजन बोस, कार्तिक राजा, अभिनेत्री रमा वीज आदी उपस्थित होते. चित्रपट हे केवळ दोन प्रकारचे असतात एक चांगला व दुसरा वाईट. भाषेच्या आधारावर चित्रपटांची निवड केली जात नाही झालीच तर ती सिनेमाच्या भाषेच्या आधारावर होते.

आजकाल कोणीही चित्रपट बनवत असून आपण चित्रपटाची निर्मिती केलीय किंवा अभिनेता आणि अभिनेत्री म्हणून मिरवावे, असे वाटतेय. केवळ कथानक चांगले आहे म्हणजे चित्रपट चांगला आहे, असे म्हणता येत नाही. चित्रपटाचा सर्वांगीण विचार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्य प्रवाहातील चित्रपटांना मिळणारे स्थान महत्त्वाचे

देशभरातील तसेच जागतिक स्तरावरील विविधांगी चित्रपटांना जसे ‘इफ्फी’त स्थान आहे, तसे भारतीय मुख्य प्रवाहातील चित्रपटांनाही ‘इफ्फी’त जे स्थान मिळते, ते अतिशय महत्त्वाचे आहे. ‘इफ्फी’त केवळ देशातीलच नव्हे तर आंतराष्ट्रीय प्रतिनिधी येत असतात. त्यांना भारतात मोठ्या प्रमाणात कोणते चित्रपट पाहिले जातात. ते का पाहिले जातात याचा अभ्यास करायचा असतो. आपल्या मुख्य प्रवाहात मोठ्या प्रमाणात हे चित्रपट चालत असल्याने त्यांनाही ‘इफ्फी’त जे स्थान दिले जाते. ते महत्त्वपूर्णच असल्याचे ज्यूरी सभासदांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT