Goa Jobs Scam
Goa Jobs Scam Dainik Gomantak
गोवा

Job Scam In Goa : नौदलातील शिक्षिकेचा गोव्यातील अनेक युवकांना लाखोंचा गंडा

सुशांत कुंकळयेकर

नौदलात कंत्राटी पद्धतीवर काम करणारी शिक्षिका पुर्णिमा कोळंबकर या कारवार येथील महिलेने नौदलात नोकरी देण्‍याच्‍या बहाण्‍याने गोव्‍यातील तसेच कारवारमधील अनेक युवकांना लाखाेंचा गंडा घातल्‍याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

या महिलेसह अन्‍य चाैघांवर मायणा-कुडतरी पोलिसांत काणकोणमधील एका युवकाला 27 लाखांचा गंडा घातल्‍याचा गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. या महिलेवर कारवारात काही युवकांनी आपल्‍याला 60 लाखांचा गंडा घातल्‍याच्‍या तक्रारी नोंद केल्‍या असून या महिलेने गोव्‍यातील आणखी काही युवकांनाही असेच गंडविल्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.

काणकोण येथील (सध्या मडगाव येथे राहणारा) साईश कोमरपंत नावाच्‍या युवकाने या चार जणांविरोधात मायणा-कुडतरी पोलिस स्‍थानकात तक्रार नोंदविली आहे. भारतीय नौदलात लेफ्‍टनंट कमांडरची नोकरी देण्‍याचे आमिष दाखवून त्याला तब्‍बल 27.72 लाखांचा गंडा घालण्‍यात आल्‍याचे तक्रारीत म्‍हटले आहे.

याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी पाच जणांवर गुन्‍हा नोंद केला आहे. पुर्णिमा कोळंबकर हिच्‍यासह राजेश नाईक, विषया गावडे, अक्षता गावडे व सोनिया आचारी अशी संशयितांची नावे आहेत.

असा आहे फसवणुकीचा घटनाक्रम

  1. आपला एमएससीचा अभ्‍यासक्रम पूर्ण केलेल्‍या साईश याच्याकडे याप्रकरणी सर्वांत आधी बाळ्‍ळी येथील राजेश नाईक याने संपर्क साधला होता. आपली एका महिलेशी ओळख आहे. तिच्‍यामार्फत तुला नौदलात चांगल्‍या पगाराची नोकरी मिळू शकेल, असे आमिष दाखविले होते.

  2. त्‍यानंतर राजेशने त्‍याची गाठ दवर्ली येथे राहणाऱ्या विषया गावडे हिच्‍याशी घालून दिली होती. नोकरी देण्‍यासाठी त्‍याच्‍याकडून सुरवातीला १५ लाख रुपये घेण्‍यात आले होते.

  3. त्‍यानंतर सोनिया आचारी हिच्‍यामार्फत पुर्णिमा कोळंबकर हिच्‍याशी साईशची गाठ घालून दिली. नौदलात एक अधिकारी आपल्‍या चांगल्‍या ओळखीचा आहे. तो तुला नोकरी लावून देणार, असे त्‍याला सांगण्‍यात आले.

  4. त्‍यानंतर त्‍याची खात्री पटविण्‍यासाठी त्‍याला नौदलातून एक मेलही पाठविण्‍यात आला. नंतर त्‍या अधिकाऱ्याने त्‍याला फोन करून तुला गोव्‍यात पोस्‍टींग पाहिजे तर आणखी दहा लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगून आणखी पैसे उकळले.

  5. या सर्वांवर पोलिसांनी भादंसंच्‍या ४२० कलमाखाली गुन्‍हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक रवी देसाई यांच्‍या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत भगत पुढील तपास करीत आहेत. साईश कोमरपंत हा तक्रारदार आहे. तो सध्‍या फातोर्डा येथील राजेश नगर येथे राहतो.

यामध्ये मोठे रॅकेट असण्‍याची शक्‍यता

हे प्रकरण म्‍हणजे एक मोठे रॅकेट असण्‍याची शक्‍यता तपास अधिकारी रवी देसाई यांनी व्‍यक्‍त केली असून संशयितांना ताब्‍यात घेतल्‍यानंतरच त्‍याचा उलगडा होऊ शकेल, असे ‘दै. गोमन्तक’शी बोलताना सांगितले.

या महिलेने गोव्‍यातील अनेक युवकांना नोकरीचे आमिष दाखवून गंडा घातल्‍याचा आरोप आहे. मात्र, आतापर्यंत फक्‍त एकच प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. या प्रकरणाच्‍या मुळाशी गेल्‍यास पोलिसांना बरेच मोठे घबाड हाती लागण्‍याची शक्‍यता आहे.

रोख व ऑनलाईन व्यवहार

संशयितांनी साईशला भारतीय नौदलात लेफ्‍टनंट कमांडरची नोकरी देऊ, असे सांगून त्‍याच्‍याकडून 27 लाख रुपये उकळले. रोख व ऑनलाईन बँकिंगद्वारे ही रक्‍कम घेण्‍यात आली. 21 नोव्‍हेंबर 2020 पासून हा प्रकार चालू होता.

रुमडामळ-दवर्ली येथे ही घटना घडली होती. रक्‍कम घेऊनही नोकरी मिळाली नसल्‍याने फसलो गेल्‍याचे लक्षात आल्‍यानंतर तक्रारदाराने मायणा-कुडतरी पाेलिस ठाण्‍यात तक्रार नाेंद केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT