गोवा

Goa: भारतीय नौदल, हवाई दलाचा गोव्यात 'सायक्लोन' सराव; हिंद महासागर क्षेत्रातील 8 देशांचा सहभाग

मानवी संकटे आणि नैसर्गिक आपत्तींच्या वेळी सामूहिक प्रभावी प्रतिसाद यंत्रणा विकसित करणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे.

Pramod Yadav

भारतीय नौदल आणि हवाई दलाच्या वतीने हिंद महासागर क्षेत्रातील (IOR) आठ देशांसह वार्षिक संयुक्त HADR सराव 'सायक्लोन' सोमवारपासून गोव्यात सुरू झाला.

या अभ्यासादरम्यान, मानवी संकटे आणि नैसर्गिक आपत्तींच्या वेळी सामूहिक प्रभावी प्रतिसाद यंत्रणा विकसित करण्यावर भर दिला जाईल.

भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलाने 2016 मध्ये या संयुक्त सरावाला सुरुवात केली होती. तेव्हापासून दोन्ही लष्कर एकामागून एक या वार्षिक सरावाचे आयोजन करत आहेत.

नौदलाच्या वतीने गोव्यात सुरु झालेला सराव 11 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या सरावात हिंदी महासागर क्षेत्रातील आठ देशांनी सहभाग घेतला आहे. हवामान बदलामुळे किनारपट्टीच्या क्षेत्रातील भागात वाढत्या धोक्यामुळे भारतीय सशस्त्र दलांना मदतीचे आवाहन केले जाते.

मानवी संकटे आणि नैसर्गिक आपत्तींच्या वेळी सामूहिक प्रभावी प्रतिसाद यंत्रणा विकसित करणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे.

गोव्याच्या किनारपट्टीवर तीन दिवस चालणाऱ्या या सरावात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (NIDM), भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, तटरक्षक दल यांनी सहभाग घेतला आहे.

याशिवाय मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट (IMD), नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सीज, इंडियन नॅशनल ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस सेंटर, सेंट्रल वॉटर कमिशन, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) तसेच मित्र देशांचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT