Mohit Sharma Viral Video In Goa Dainik Gomantak
गोवा

Viral Video: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघात मिळाले नाही स्थान, भारतीय गोलंदाज पत्नीसह गोव्यात करतोय धम्माल

आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करून देखील मोहित शर्माला या दौऱ्यासाठी संधी मिळाली नाही.

Pramod Yadav

Mohit Sharma Viral Video In Goa: आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. 12 जुलैपासून, सुरू होणाऱ्या या दौऱ्यात कसोटी, एकदिवसीय आणि T20 सामने खेळले जाणार आहेत.

या दौऱ्यासाठी एकदिवसीय संघात जयदेव उनाडकट, उमरान मलिक, मुकेश कुमार यांना संधी देण्यात आली आहे. पण, आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करून देखील मोहित शर्माला या दौऱ्यासाठी संधी मिळाली नाही.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संधी मिळाली नसल्याने वेगवान गोलंदाज मोहित शर्मा सध्या गोव्यात धम्माल करत आहे. मोहित शर्मा सध्या पत्नीसोबत गोव्यात आला असून, त्याने गोव्यातून एक व्हिडिओ शेअर केला आहे.

यात मोहित शर्मा एका रेस्टॉरंटमध्ये गेला असून, तेथील काही क्षण त्याने व्हिडिओच्या माध्यामातून शेअर केले आहेत. सध्या मोहितचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

भारतीय संघ वेस्ट इंडिज विरोधात तीन एकदिवसीय, दोन कसोटी आणि पाच T20 सामने खेळणार आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी असा आहे भारतीय संघ

ODI: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (वीसी), शार्दुल ठाकूर, आर जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मो. सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

TEST: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (व्हीसी), केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lepidagathis Clavata: म्हादई खोऱ्यातल्या चोर्ला घाटानंतर 166 वर्षांनी फुललेली वनस्पती, 2024 मध्ये आढळली आंबोली परिसरात

Taleigao: वांगी, आंबा, तांदूळ, काजू बोंडेसाठी GI दर्जा मिळालेले; विशिष्ट मातीच्या गुणधर्माचे 'ताळगाव'

Goa Budget: विकासकामांचा धडाका, आश्वासनांची 99% अंमलबजावणी सुरू; फेब्रुवारीत गोव्याचा अर्थसंकल्प येणार?

Goa Third District: तिसरा जिल्हा झाला; पण 'रविं'चे स्वप्न पूर्ण झाले?

Kushavati District Goa: तिसऱ्या जिल्ह्यावरून वाद थांबेना! ‘कुशावती’चे मुख्यालय केपे नको; काणकोणवासीयांचे मत

SCROLL FOR NEXT