Ayuraksha  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : ‘भारतीय आयुर्वेद संस्थे’चा ‘आयुरक्षा’पॅक ठरतोय वरदान

साथीच्या रोगांवर मात करण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्यांसाठी आयुरक्षा पॅक वरदान ठरत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News : पणजी, हवामानातील बदलामुळे साथीचे आजार फैलावतात. यापासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वर्धक असा काढा भारतीय आयुर्वेद संस्थेने तयार केला आहे. विनाशुल्क पद्धतीने धारगळ येथील इस्पितळात तो उपलब्ध केला आहे.

साथीच्या रोगांवर मात करण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्यांसाठी आयुरक्षा पॅक वरदान ठरत आहे.

फार्मसी विभागात नोंदणी केलेल्‍या रुग्णाने मान्य केल्यास वा आरोग्य शिबिरात वाटपासाठी संस्थेने लेखी मागणी केल्यास तो वाटपासाठी दिला जाणार आहे. राज्यभरात याचा प्रसार करण्यासाठी संस्थेने शिबिरे घेणेही सुरू केले आहे.

संस्थेच्या अधिष्ठाता डॉ. सुजाता कदम यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले, की ‘आयुरक्षा’ नावाने एक पॅकच तयार केले आहे. त्यात या काढ्यासह च्यवनप्राश, संशमनी वटी आणि अनू तेल दिले आहे. आयुष क्वाथ या नावाने हा काढा ओळखला जातो.

कोविड काळात दिल्लीत ८० हजार पोलिसांना हा काढा देण्यात आला. यामुळे कोविडपासून त्यांना संरक्षण मिळालेच, त्यापैकी कोविडची लागण झालेल्यांचे प्रमाण खूप कमी होते आणि त्यांनाही कोविडमुळे होणारा त्रास जाणवला नाही. याविषयी सखोल संशोधन करण्यात आले असून त्याविषयीची संशोधन पेपर प्रसिद्ध केला आहे.

दिल्लीतील संस्थेतून आता हा रोग प्रतिकारशक्ती वर्धक असा काढा गोव्यात उपलब्ध केला आहे. मागणीनुसार रुग्णांना त्या पॅकचे वितरण केले जाते. अनेकांनी त्याचा लाभ घेतला आहे. काही शिबिरांसाठी त्याची मागणी केल्यास संस्था तो पुरवू शकेल.

याआधी ज्या लोकांनी आयुरक्षा पॅक वापरला त्यांच्या हवाल्याने मलेरिया, डेंग्यू सारख्या रोगांची साथ पसरली होती,मात्र आयुरक्षा पॅक घेतलेल्यांना या साथीच्या रोगांचा सामना करावा लागला नसल्याचे संस्थेच्या सूत्रांनी सांगितले.

‘मुलांसाठी बालरक्षा’ पॅक

आयुर्वेदाचा भर हा रोगाचा शरीरावर हल्ला झाल्यास शरीर त्याला बळी पडू नये, यावर असतो. त्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवावी लागते. यासाठी जीवनशैलीत काही बदल करतानाच हा काढा घेतल्यास साथीच्या आजारांंपासून दूर राहणे शक्य होते.

लहान मुलांसाठी बालरक्षा नावाने पॅक तयार केले आहे. याच धर्तीवर सर्वसाधारण असे स्वास्थ रक्षा कीटही तयार केले आहे. त्याचेही वितरण मोफत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT