Goa Theft|Goa Crime Canva
गोवा

Salcete Theft: सासष्टीत चतुर्थीकाळात चोरांचा उच्छाद! बंद घरे, दुकाने लक्ष्य; वाहनचोरीचीही नोंद

Goa Theft: घरे फोडून सोने, रोकड चोरीस गेल्याची प्रकरणांत वाढ झालेली दिसत आहे; लोकांमध्ये भिती

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Theft News

सासष्टी: चतुर्थीच्या दिवसात पोलिसांची गस्त वाढलेली असूनसुद्धा सासष्टीत चोरांचा सुळसुळाट वाढलेला आहे. घरे फोडून सोने, रोखड चोरीस गेल्याची प्रकरणांत वाढ झालेली दिसत आहे.

चतुर्थी साजरी करण्यास आपल्या गावी गेल्याची संधी साधून चोरांनी एका घरातील सोने व रोखड पळवली. कोलवा पोलिस हद्दीत एकाच रात्री चोरीच्या दोन घटना घडल्या. वार्का येथील एका फार्मसीचे शटर फोडून चोरट्यांनी ४७७२२ रुपये पळवले.

नंतर मांस विक्री दुकान फोडून १.२० लाख रुपयांची रक्कम चोरली. बाळ्ळी केपे येथील उमेश वेळीप चोरीची पोलिस तक्रार केली आहे. कोलवा येथील एलोजिओ एडवर्ड गोम्स याने पोलिस स्थानकांत दुचाकी चोरीची तक्रार नोंदवली आहे. सेर्नाभाटी येथील एका व्यक्तिने आपली पीकअप चोरीस गेल्याची नोंद आहे.

कुंकळ्ळी पोलिसांकडे चोरीची सात प्रकरणे नोंद झाली. त्यात ३४.१६ लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेला. त्यातील पोलिसांनी १५.५४ लाख रुपयांचा ऐवज मिळवला. मडगाव पोलिस स्थानकात ४९.०२ लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला त्यातील केवळ ७५ हजार रुपयांचा ऐवज मिळवण्यास पोलिसांना यश आले आहे.

मायणा कुडतरी पोलिस स्थानकांत ८ चोऱ्यांची नोंद आहे, त्यातील सात चोऱ्यांचा निकाल लागला व ११ संशयतींना अटक करण्यात आली. व एकुण ८.३७ लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे कळते. त्यातील २.७६ लाख रुपयांचा ऐवज पोलिसांना परत मिळवता आला. कोलवा पोलिस स्थानकात पाच चोरीची प्रकरणे नोंद झाली. त्यातील तीन प्रकरणांचा निकाल लागला. व एकस अटक करण्यात आली. त्यातून पाच लाख रुपया पैकी १.९० लाख रुपयांचा ऐवज परत मिळविण्यास पोलिसांना यश आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT