Goa Stray Cattle Issue Dainik Gomantak
गोवा

Goa Stray Cattle Issue: राज्यातील भटक्या गुरांच्या समस्येत वाढ! गुरांच्या हल्ल्यात मयेतील दुचाकीस्वार दाम्पत्य जखमी

Goa Stray Cattle Issue: राज्यातील भटक्या गुरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.

Kavya Powar

Goa Stray Cattle Issue: राज्यातील भटक्या गुरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. काल (मंगळवारी) सकाळी केळबायवाडा-मये येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील जंक्शनवर भटक्या गुरांनी केलेल्या हल्ल्यात दुचाकीवरील दाम्पत्य जखमी झाले.

जखमी शिरोडकर दाम्पत्य हे मये येथील असल्याची माहिती मिळाली आहे. प्राप्त माहिती अशी, की गावकरवाडा-मये येथील शिरोडकर दाम्पत्य स्कूटरवरुन डिचोलीच्या दिशेने जात होते. केळबायवाडा येथे चढणीवर पोचताच रस्त्यावरील गुरांनी स्कूटरला धडक दिली. त्यात शिरोडकर नवरा-बायको स्कूटरसह रस्त्यावर पडले.

त्याबाजूने जाणारे स्वयंम कामत यांनी लागलीच जखमी दामपत्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तिथे उपचार करुन त्यांना घरी पाठवले. मये भागात मोकाट गुरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. केळबायवाडा ते वण्ण्यारपर्यंत तर सदैव गुरे रस्त्यावर संचार करताना आढळून येतात. वर्षांपूर्वी गुरांनी केलेल्या हल्ल्यात तेथीलच एका हॉटेलमालकाचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले होते. मोठा अनर्थ घडण्यापूर्वी या गुरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025 Schedule: प्रतीक्षा संपली! 'आशिया कप'चं वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT