Pepper |Goa Agriculture Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: मिरीच्या दरात वाढ; पण उत्पादनात घट

काणकोणात मिरी वेलींना मर रोगाची लागण झाल्याने मिरी पीक यंदा घटले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Agriculture: काणकोणात मिरी वेलींना मर रोगाची लागण झाल्याने मिरी पीक यंदा घटले आहे. मात्र मिरीचे प्रति किलो दर वाढले आहेत. गोवा बागायतदार संस्थेच्या मंगळवारच्या खरेदी दर पत्रकाप्रमाणे मिरीचा दर प्रति किलो दर 481 रूपये आहे.

तर सफेद मिरीचा प्रति किलो दर 640 रूपये आहे. मात्र उत्पादन घटल्याने या वाढीव दराचा फायदा यंदा बागायतदारांना घेता येणार नाही.

यंदा काणकोणातील मिरी उत्पादन या ‘मर’ रोगामुळे पन्नास टक्क्यांनी घटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.मिरीची लागवड प्रामुख्याने पोफळीच्या झाडांवर करतात. काणकोणात लोलये, पैंगीण, खोला पंचायत क्षेत्रात नारळ पोफळीच्या बागा सर्वाधिक असल्याने या भागात मिरी पीक घेतले जाते.

मात्र मर रोगाने वेली मरू लागल्याने मिरी काढणीचा मजुरी खर्चाचा परतावा मिळणे कठीण बनले आहे.

दर दहा वर्षांनी जुन्या मिरी वेली मरतात !

जुन्या मिरी वेली दर दहा वर्षांनी मरत असतात.त्या मरण्यापूर्वी त्या जागी नव्या वेलीची लागवड करणे गरजेचे असते. मिरी वेलींना ‘मर’ रोगाची लागण झाल्यानंतर त्या सुकू लागतात.

मात्र त्यापूर्वीच त्यांच्या मुळात जमिनीत रोग प्रतिकारक औषधांची पेरणी करणे गरजेचे असते. त्यामुळे रोगाला प्रतिबंध लावता येतो असे विभागीय कृषी अधिकारी किर्तीराज नाईक गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT