non alcoholic fatty liver Dainik Gomantak
गोवा

गोव्‍यात ‘नॉन अल्‍कोहाेलिक फॅटी लिव्‍हर’ रुग्‍णसंख्‍येत वाढ

मधुमेह, बैठी जीवनशैली कारणीभूत : उपचार न घेतल्‍यास यकृताचा कर्करोग होण्‍याची शक्‍यता

दैनिक गोमन्तक

गोव्‍यात मधुमेह रुग्‍णांची संख्या वाढत असतानाच नॉन अल्‍कोहोलिक फॅटी लिव्‍हर (एनएएफएलडी) रुग्‍णांच्‍या संख्‍येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मधुमेह आणि बैठी जीवनशैली हेच या राेगाचे मुख्‍य कारण असल्‍याचे डॉक्टर सांगतात. या रोगाकडे दुर्लक्ष करू नका, असा इशारा देत या व्‍याधीवर वेळीच उपाय केले नाहीत तर लिव्‍हर सिरोसिस किंवा यकृताचा कर्करोगही होण्‍याची भीती डॉक्‍टरांनी व्‍यक्‍त केली आहे.

यासंदर्भात, ॲन्‍डो क्रिनोलाॅजिस्‍ट डॉ. वैभव दुकळे यांना विचारले असता, ते म्हणाले ‘एनएएफएलडी’ची बाधा झालेल्या रुग्‍णांना लक्षणे सहज दिसून येत नाहीत. मात्र, त्‍यांच्‍या यकृताची सोनोग्राफी किंवा फायब्रो स्‍कॅनची चाचणी केल्‍यास ही लक्षणे दिसून येतात.

स्‍थूल व्‍यक्‍ती, मधुमेही व्‍यक्‍ती, प्री-डायबेटीस आणि अधिक कोलेस्‍ट्रॉल असलेल्‍या व्‍यक्‍तींना एनएएफएलडीची बाधा होण्‍याचे प्रमाण अधिक दिसून येते. यावर मात करायची असल्‍यास व्‍यायाम हा सर्वांत अधिक चांगला उपाय आहे.

एनएएफएलडी या व्‍याधीने एकूण २० ते ३० टक्‍के भारतीय ग्रासले आहे. २० ते ४० या कमी वयोगटातील लोकही आता या व्‍याधीचे शिकार बनू लागले आहेत.

नॉन अल्‍कोहाेलिक फॅटी लिव्‍हर व्‍याधी म्‍हणजे मद्यसेवन न करणाऱ्या लोकांच्‍याही यकृताला सूज येण्‍याचा प्रकार असून या व्‍याधीचे परिणाम त्‍वरित कळून येत नसले तरी वेळेवर त्‍यावर उपाय घेणे गरजेचे आहे. वास्‍तविक या व्‍याधीला कसले औषधही नाही. व्यायाम हाच त्यावर सर्वात चांगला उपाय आहे.

‘अल्‍ट्रासाउंड’द्वारेच होते व्याधीचे निदान

  • जोपर्यंत यकृताची मोठी हानी होत नाही, तोपर्यंत या रोगाची लक्षणे दिसून येत नाहीत.

  • कुठलीही व्‍यक्‍ती अल्‍ट्रासाउंड चाचणी करते त्‍यावेळीच ही व्‍याधी जडल्‍याचे कळून येते.

  • ही व्‍याधी तपासण्‍यासाठी यकृताची बायप्‍सी हीच योग्‍य पद्धत आहे. मात्र, यासाठी इतरही चाचण्‍या केल्‍या जातात.

गोव्‍यातील बरेच लोक आता कष्‍टाची कामे न करता बैठ्या जीवनशैलीच्‍या आहारी गेले आहेत. याचाच परिणाम म्‍हणजे गोव्‍यात ‘एनएएफएल’डी रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. पाच वर्षांत हे प्रमाण लक्षणीय आहे.

- चित्रलेखा नायक, डॉक्टर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT