Goa: मासळी बाजार तुकाराम सावंत
गोवा

गोव्यात मासळी दरात वाढ

बांगडे 250 ते 300; तर पापलेट 1200 प्रती किलो

दैनिक गोमन्तक

पणजी: मासळीचे दिवसेंदिवस दर वाढत चालले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मासळीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. गेल्या आठवड्यात 200 ते 250 रुपये प्रती किलो दराने बांगडे बाजारात उपलब्ध होते; मात्र आता त्यांच्या दरात वाढ झाली आहे. पापलेट देखील 1 हजार ते 1 हजार 200 रुपये प्रती किलो दराने बाजारात उपलब्ध होते.

आज पणजी मासळी बाजारात इसवण, कर्ली, लेपो, माणकी, खुबे, कोळंबी, टोकी, समुद्री खेकडे आदी विविध प्रकारची मासळी मुबलक प्रमाणात विक्रीस उपलब्ध होती. सकाळी 9 च्या सुमारास मासळी खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ अधिक होती. काही मासळी विक्रेते किलोच्या दरात विकत होते; तर काही प्रती वाटा दराने विकत होते.

वाट्याच्या दराने लहान बांगडे 200 रुपयांना 8 या दराने उपलब्ध होते. राज्यातील कोरोनास्थिती सुधारत असून धंदेवाईक आत्ता कुठे सावरत आहेत. मात्र वाढत्या महागाईने सर्वांनाच ग्रासले आहे. इंधनाचे दर वाढल्याने सर्वच क्षेत्रात महागाई वाढली आहे. गोमंतकीय पद्धतीने केलेले मासळीचे कालवण (हुमण), फिश फ्रायचा आस्वाद चाखण्यासाठी अनेक खवय्ये तसेच पर्यटक गोव्यात येतात; मात्र वाढत्या मासळीच्या दरामुळे मासळी प्लेटच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणाला तळलेली मासळी आवडते तर कोणाला हुमणातली, कुणाला इसवणाची पोस्ता आवडतात तर कुणाला प्रॉन्स फ्राय; मात्र काहींना तर दररोजच्या जेवणात मासळी लागतेच लागते.

मासळी दर

तार्ली - 200

बांगडा - 250 ते 300

समुद्री खेकडे - 250-300

कोळंबी - 300ते 600 (आकारानुसार)

पापलेट - 1200

इसवण - 750 - 850

माणकी - 350-400

कर्ली - 350

टोकी - 200

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT