Goa House Collapsed Dainik Gomantak
गोवा

House Collapses At Margao: जोरदार पावसामुळे घरे कोसळण्‍याच्‍या घटना सुरूच

Goa House Collapsed: मडगाव आणि जवळच्‍या परिसरात आठ घरांची पडझड झाल्‍याची नोंद आहे

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: मागचा आठवडाभर पडत असलेल्‍या जोरदार पावसामुळे अनेक जुनी मातीची घरे कोसळली असून येथील जुन्‍या बाजारातील एका जुन्‍या घराची भिंतही काल कोसळून पडण्‍याची घटना घडली.आतापर्यंत मडगाव आणि जवळच्‍या परिसरात आठ घरांची पडझड झाल्‍याची नोंद आहे.

काल ज्‍या घराची भिंत पडली त्‍याच्‍या मातीमुळे पाणी वाहून जाण्‍याची वाट बंद झाल्‍याने आणखी गंभीर स्‍थिती उद्‍भवली होती. मात्र सासश्‍‍टीचे मामलेदार प्रतापराव गावकर यांनी तातडीने घटनास्‍थळी धाव घेऊन ती माती दूर केली. या पडझड झालेल्‍या घरामुळे अन्‍य घरांनाही धोका असल्‍यामुळे या घरमालकाला लवकरच नोटीस बजावण्‍यात येणार असल्‍याची माहिती मामलेदार कार्यालयातून प्राप्‍त झाली आहे.

दरम्‍यान, पावसामुळे ठिकठिकाणी दरडी कोसळण्‍याच्‍या घटना घडल्‍या असून मोती डोंगराच्‍या पायथ्‍याशी असलेल्‍या घरांना त्‍यामुळे धोका निर्माण झाला आहे. या पायथ्‍याशी असलेली बहुतेक घरे बेकायदेशीर असून या घरांवर कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT