Bicholim Urak Story Dainik Gomantak
गोवा

Bicholim Urak Story: डिचोलीत धडधडू लागल्या काजू भट्टया; दारू गाळणी जोरात

डिचोली तालुक्यातील गावोगावी सुटला हुर्राक अन्‌ फेणीचा घमघमाट..!

दैनिक गोमन्तक डिजिटल

Bicholim Urak Story: डिचोलीत तालुक्यात सध्या काजूपासून दारू गाळण्याचा व्यवसाय जोमात सुरू असून, बहूतेक ठिकाणी दारुभट्टयांवर लगबग सुरु असल्याचे आढळून येत आहे. दारू गाळणीचा व्यवसाय जोरात सुरु असल्याने गावोगावी हूर्राक आणि फेणीचा घमघमाट सुटला आहे.

सध्या काजू पीक पूर्ण बहरात आले असून, काजू व्यवसाय जोमात सुरु झाला आहे. संतुलित हवामान राहिल्यास यंदा काजू पीक समाधानकारक असण्याची शक्यता आहे. कृषी खात्यानेही तसा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या काजू झाडे बोंडूंनी बहरली आहेत.

''कोविड'' निर्बंधानंतर दोन वर्षांनी यंदा मुक्तपणाने काजू व्यवसायात लक्ष घालायला मिळत असल्याने काजू बागायतदार आणि व्यावसायिकांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलले आहे.

यंदा राज्यातील काही भागात वणव्यामुळे काजू बागायती भस्मसात झाल्या आहेत. डिचोली तालुक्यात मात्र पाच-सहाठिकाणचे अपवाद वगळता काजू बागायतींची म्हणावी तशी हानी झालेली नाही.

यंदा अजून काजूसाठी हवामान पोषक आहे. यंदा समाधानकारक काजू पीक मिळेल, असा अंदाज विभागीय कृषी कार्यालयातून कृषी व्यक्त करण्यात आला आहे.

50 टक्के दारू परराज्यातील बोंडूपासून !

डिचोली तालुक्यातील बहूतेक म्हणजेच 80 टक्के काजू बागायतदार दारू व्यवसायात आहेत. त्यापैकी बहूतेक दारू व्यावसायिक स्थानिक बागायतींतून मिळणाऱ्या काजूबोंडूवर अवलंबून न राहता, सीमेलगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बोंडूची आयात करतात.

महाराष्ट्रात काजू बोंडूपासून दारु गाळण्यास बंदी असल्याने महाराष्ट्रात काजू बोंडूना भाव नाही. त्यामुळे स्थानिक काजू व्यावसायिकांचे आयतेच फावत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माटणे, वजरे, चंदगड आदी काही भागातून डिचोलीत काजूबोंडूंची आवक होते.

सिंधुदुर्गातील काहीजण स्वतः थेट काजूबोंडूचा पुरवठा करतात. डिचोलीत दरवर्षी जे दारु उत्पादन होते, त्यातील 40 ते 50 टक्के उत्पादन राज्याबाहेरील काजूबोंडूपासून मिळते.

काजूपिकात डिचोली आघाडीवर

कृषीप्रधान डिचोली तालुका हा काजू पिकाबाबतीत आघाडीवर आहे. तालुक्यातील नार्वे, पिळगाव, सर्वण, कारापूर, मेणकूरे, मये आदी काही गावे काजू व्यवसायात आघाडीवर आहेत. बहुतेक गावातील माळराने, डोंगरमाथे काजूच्या झाडांनी व्यापलेले आहेत.

काजू हे नगदी पीक असल्याने प्रत्येक बागायतदाराचे या हंगामाकडे लक्ष लागून राहते. काजू पिकाव्दारे मिळणाऱ्या उत्पन्नातून बहूतेक कुटुंबांची वर्षभर सहजपणे गुजराण होत असते. त्यामुळे बहूतेक बागायतदारांनी माळरानांसह भरड शेतजमिनीत काजू कलमांची लागवड केली आहे.

पायाने काजू बोंडू मळण्याला फाटा; यंत्रांचा वापर

एक काळ असा होता, की गावोगावी ''कोळमी''वर पायाने काजूबोंडू मळण्यात येत होते. मात्र गेल्या २५ ते तीस वर्षांपासून या व्यवसायात आधुनिकता आली. मोठ्या प्रमाणात काजूबोंडू उपलब्ध होत असल्याने व्यावसायिकांनी यंत्रांचा वापर सुरू केला.

आता तर बहूतेक व्यावसायिक यंत्रांद्वारे काजूबोंडू मळतात. नाही, म्हटले तरी, काजूबोंडू कमी उपलब्ध होणारे काजू बागायतदार अजूनही पारंपरिक पद्धतीने पायाने काजूबोंडू मळतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

SCROLL FOR NEXT