Winter Weather Dainik Gomantak
गोवा

Winter Weather: राज्यात थंडीची चाहूल पारा 24 अंशांवर घाटालगत गारवा

Winter Weather: राज्यात पहाटे थंडी जाणवू लागली आहे. थंडीच्या चाहुलीमुळे आॅक्टोबर हीट आणि सातत्याने होणाऱ्या हवामानबदलांपासून काहीसा दिलासा मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

Winter Weather: राज्यात पहाटे थंडी जाणवू लागली आहे. थंडीच्या चाहुलीमुळे आॅक्टोबर हीट आणि सातत्याने होणाऱ्या हवामानबदलांपासून काहीसा दिलासा मिळत आहे. राज्यात पहाटे थंडी जाणवत आहे. पुढील काही दिवस राज्यातील तापमानात पुढील काही दिवस मोठे बदल घडण्याची शक्यता नसल्याने हुडहुडीचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे.

सध्या किमान तापमान 24 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. घाटालगतच्या भागात सत्तरी, धारबांदोडा, मोले आणि राज्यातील बहुतांश भागात तीव्र थंडी जाणवत आहे. तर शहरी भागात तसेच किनारी भागात देखील अल्प प्रमाणात थंडीची चाहुल आहे.

सकाळी मोठ्या प्रमाणात दव आणि धुकेही पडत आहे. वातावरणातील बदलामुळे अनेकांनी उबदार कपड्यांचा वापर सुरू केला आहे. मॉन्सुनोत्तर लांबलेला पाऊस आणि यंदा सततच्या होणाऱ्या हवामान बदलातदेखील थंडीचे आगमन निर्धारित वेळेतच झाल्याचे हवामान अभ्यासकांचे मत आहे. सामान्यतः नोव्हेंबरपासून हिवाळ्याला सुरूवात होते त्यामुळे नोव्हेंबरमध्ये राज्यात हुडहुडी भरवणारी थंडी पडेल. आज पणजी येथे कमाल 33.4 अंश सेल्सिअस तर किमान 24 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

पारा घसरणार 20 अंशांवर

काही दिवसांत थंडी अधिक वाढण्याची शक्यता आहे. घाटलगतच्या भागात सद्यस्थितीत अधिक प्रमाणात थंडी जाणवत आहे. थंडीचा अनुभव मोठ्या प्रमाणात नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात घेता येईल. त्यावेळी पणजीसहित किनारी भागातील किमान तापमान २० अंशापर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे.

संसर्गजन्य आजारांत वाढ

वातावरणातील बदल, धुके व इतर कारणांमुळे सर्दी, खोकला, पडसे, ताप आदी संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी गरम पाणी पिणे, बाहेरील अन्न तसेच तेलकट पदार्थ टाळावे. थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे वापरण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT